सख्खा भाऊ पक्का वैरी... मित्रांच्या मदतीने केला भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला, CCTV समोर

Last Updated:

Buldhana News: मित्रांच्या मदतीने सख्खा भाऊ आणि वहिनीला मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

बुलढाणा बातम्या
बुलढाणा बातम्या
बुलढाणा : सख्ख्या भावानेच दोन मित्राच्या मदतीने आपल्या भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलढाणा तालुक्याच्या हतेडी बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नी शेतात जाण्यासाठी रस्त्यावर उभे असताना अचानक आलेल्या तिघांनी पीडितांना गंभीर मारहाण केली. घटनेत अरुण निकाळजे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
या प्रकरणी तीनही आरोपी विरोधात बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात मध्ये कैद झाली आहे. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी पीडितांना एवढी मारहाण केली, की त्यांना काही बोलताही येत नव्हते. सलग काही मिनिटे मारहाण सुरू असल्याने पीडित निपचित पडून होते. एखाद्या जनावराला मारहाण व्हावी, तशी मारहाण होत असल्याने बघ्यांची गर्दी झालेली असतानाही, त्यातील कुणीच भीतीपोटी आरोपींना रोखले नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सख्खा भाऊ पक्का वैरी... मित्रांच्या मदतीने केला भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला, CCTV समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement