कथित बोगस मतदाराला पकडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसाला शिवीगाळ, संजय गायकवाड यांची जीभ घसरली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बोगस मतदाराला पळून जाण्यात गायकवाड यांच्या सुपुत्राने मदत केल्यावर नागरिकांनी रोष व्यक्त केला. या सगळ्या प्रकरणावर बुधवारी संजय गायकवाड यांना विचारले असता कर्तव्यदक्ष पोलिसाला त्यांनी शिव्या घातल्या.
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा : नगर परिषद निवडणुकांत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदारांना आणल्याचा आरोप तेथील विरोधकांनी केला होता. तसेच कथित बोगस मतदाराला नागरिकांनी पकडल्यानंतर आणि चोप देताना आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी संबंधिताला पळून जायला मदत केली होती. यावरून गायकवाड पिता पुत्रावर टीका होत असताना आमदार महोदयांनी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला शिवी घातली.
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान झाले. बुलढाणा नगर परिषद निवडणुकांनी राड्यांनी गाजली. आमदार संजय गायकवाड यांनी कथित बोगस मतदार आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच एका बोगस मतदाराला पकडल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र त्याच बोगस मतदाराला पळून जाण्यात गायकवाड यांच्या सुपुत्राने मदत केल्यावर नागरिकांनी रोष व्यक्त केला. या सगळ्या प्रकरणावर बुधवारी संजय गायकवाड यांना विचारले असता कर्तव्यदक्ष पोलिसाला त्यांनी शिव्या घातल्या.
advertisement
संजय गायकवाड यांची कर्तव्यनिष्ठ पोलिसाला शिवीगाळ
काल जे घडले ते सर्वांनी पाहिले. एकाला मारत असताना माझ्या मुलाने त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. ज्याला मारहाण होत होती, त्याला वाचवले. त्याच्या जागी कुणीही असता तरी त्याने हेच केले असते. त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार होता भडXXX अशी शिवराळ भाषा संजय गायकवाड यांनी वापरली.
advertisement
24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सदस्यांची निवडणूक २० डिसेंबरला
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
December 03, 2025 6:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कथित बोगस मतदाराला पकडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसाला शिवीगाळ, संजय गायकवाड यांची जीभ घसरली


