बुलढाण्यातील 'टक्कल व्हायरस'ला नवं वळण, केस गळतीनंतर आता नख गळतीचा धक्कादायक प्रकार, नेमकं कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Buldhana Rapid Hair Loss : शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळालं आहे. केस गळतीच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आता नखं गळतीचाही सामना करावा लागत आहे.
Buldhana Rapid Nails Loss : गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात (Buldana) टक्कल पडण्याच्या आजाराने धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं होतं. बुलढाण्यातील टक्कल व्हायरसने संपूर्ण महाराष्ट्राला टेन्शन दिलंय. या आजारात नागरिकांना फक्त तीन दिवसात टक्कल असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता केस गळतीनंतर आता नख गळतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळालं आहे. केस गळतीच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आता नखं गळतीचाही सामना करावा लागत आहे.
नखं कमजोर झाली अन्...
मागील काही दिवसांपासून शेगाव तालुक्यात अज्ञात कारणामुळे अनेक नागरिकांना केस गळतीचा त्रास जाणवत होता. आता या रुग्णांची नखं कमजोर झाली असून ती विद्रूप होऊन गळू लागली आहेत. यामुळे या रुग्णांची चिंता अधिक वाढली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनावर रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे.
advertisement
गंभीर वैद्यकीय समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
सुरुवातीला केवळ केस गळतीची समस्या होती, मात्र आता नखं गळती सुरू झाल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. प्रशासनाकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा मदतीचा प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या गंभीर वैद्यकीय समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
advertisement
दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, साथ रोग अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डर्मोटोलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्ट अशी मोठी टीम सध्या बुलढाण्यात काम करत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Location :
Buldana (Buldhana),Buldana,Maharashtra
First Published :
Apr 17, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुलढाण्यातील 'टक्कल व्हायरस'ला नवं वळण, केस गळतीनंतर आता नख गळतीचा धक्कादायक प्रकार, नेमकं कारण काय?







