Buladhana Takkal Virus : बुलढाण्यात टक्कल व्हायरस काय थांबेना! शेगावनंतर 'या' तालुक्यात शिरकाव,नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सुरुवातीला फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. पुढे बुलढाण्यातील लोणार सरोवरातील पाणी पिण्याच्या पाण्यात झिरपल्याने हा प्रकार घडत असावा, अशा शक्यताही बांधण्यात आल्या.
Buladhana Takkal Virus : राहुल खंडारे, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सुरवातीला टक्कल व्हायरसचे रूग्ण सापडायला सूरूवात झाली होती. तब्बल 11 तालुक्यांमध्ये हा आजातर पसरला होता. त्यामुळे रूग्णांचा आकडा 139 च्या पर्यंत पोहोचला आहे. आता या आजाराने नांदुरा तालुक्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शेगाव तालुक्यातील 11 गावामध्ये ही टक्कल व्हायरस पसरला होता मात्र आता या व्हायरस ने नांदुरा तालुक्यात ही शिरकाव केला आहे त्यामुळे खळबळ माजली आहे.नांदुरा तालुक्यातील वाडी यागावात टक्कल 7 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता टक्कल व्हायरस हळूहळू जिल्ह्यात शिरकाव करतोय का अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांचे टक्कर का पडतात हा आजार कुठला हे शोधण्यात आरोग्य विभागाला यश अजूनही आले नाही.
advertisement
टक्कल पडण्याचं कारण काय?
सुरुवातीला फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. पुढे बुलढाण्यातील लोणार सरोवरातील पाणी पिण्याच्या पाण्यात झिरपल्याने हा प्रकार घडत असावा, अशा शक्यताही बांधण्यात आल्या. मात्र अजूनही या गावातील लोकांचं टक्कल कशामुळे पडत आहे, याचं निदान करता आलं नाही. केसगळती होत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांनी अंघोळ करणं देखील बंद केलं आहे. तरीही प्रशासनाकडून अद्याप ठोस पावलं उचलल्याच दिसत आहे.
advertisement
या घटनेला जवळपास 15 दिवस उलटल्यानंतर आता अखेर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल सायन्सेस अर्थात ICMR चं पथक बुलढाण्यात दाखल होणार आहे. दुपारी १२ वाजण्याच्या आसपास चेन्नई आणि दिल्ली ICMR चं पथक बुलढाण्यात येणार आहे. इथं येऊन ते पाण्याचे नमुने घेणार आहेत, शिवाय इथल्या लोकांची केसगळती नेमकी कशामुळे होतेय, या कारणाचा शोध घेणार आहेत. ICMR च्या तपासानंतर केसगळतीचं खरं कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 14, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buladhana Takkal Virus : बुलढाण्यात टक्कल व्हायरस काय थांबेना! शेगावनंतर 'या' तालुक्यात शिरकाव,नागरीकांमध्ये भितीचे वातावरण


