अख्खं गाव टक्कलं झालं, पाण्यामुळे नाहीतर गव्हामुळे झाला घात; सरकारनेच दिलं खायला विष!
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गहू प्रामुख्याने पंजाब या ठिकाणाहून महाराष्ट्रातील रेशन दुकानावर आल्याने आणि ते नागरिकांनी खाल्ल्याने शरीरात सेलियमचे प्रमाण वाढून केस गळून टक्कल पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा: जिल्ह्यातील केस गळती प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात सहकारी संस्थांना यश आले असतानाही सरकारी संस्थांकडून अद्याप केस गळतीचे नेमके कारण जाहीर करण्यात आले नाही. मात्र ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर यांनी या केस गळतीच्या कारणाचे मूळ शोधून काढले आहे. गावातील लोकांनी खाल्लेल्या राशनच्या गव्हामधून सेलेनियम सारखा घटक मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्याने ही केस गळती झाल्याचा त्यांनी शोध लावला आहे.
advertisement
एवढेच नाही तर हा गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक टेकड्यांमधून आलेल्या दगडातील सेलेनियम हा घटक गव्हाच्या पिकाने शोषून घेतला आणि हाच गहू रेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात वाटप झाल्याचा दावा संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी केलाय. त्यामुळे केस गळती प्रकरणात राशनच्या माध्यमातून विषारी गहू बुलढाण्यात वितरित झाला असल्याचा हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. स्थानिक आरोग्य यंत्रणेसह राष्ट्रीय पातळीवरच्या आयसीएमआर सारख्या संस्थेने केस गळती प्रकरणात संशोधनासाठी केस गळतीने बाधित नागरिकांचे केस रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले खरे मात्र दोन महिने उलटून देखील या केस गळतीच्या प्रकरणामध्ये कुठलाच खुलासा करण्यात आला नाही.
advertisement
गहू खाल्ल्याने पडलं टक्कल
बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल पडण्याच्या प्रकारात महाडमधील डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन केले. बुलढाणा जिल्ह्यातील 18 गावांमध्ये टक्कल पडण्याचे प्रकार वाढले होते यावर स्वखर्चाने डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन केले तर त्यावर त्यांनी उपाय योजनाही शोधल्या आहेत. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन केले असता रेशन दुकानातील मिळणारा गहू हा या आजाराचा प्रमुख कारण ठरल्याचे त्यांनी सांगितले. तर या गव्हामध्ये सेलियमचे प्रमाण जास्त असल्याने आणि ते गहू खाल्ल्याने हा टक्कल पडण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले आहे. तर हे गहू प्रामुख्याने पंजाब या ठिकाणाहून महाराष्ट्रातील रेशन दुकानावर आल्याने आणि ते नागरिकांनी खाल्ल्याने शरीरात सेलियमचे प्रमाण वाढून केस गळून टक्कल पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
लोकांच्या जीवाशी खेळ
महत्त्वाची बाब म्हणजे या आधीच शरीरामध्ये सेलेनियमचे प्रमाण वाढल्याने ही केस गळती झाल्याने सरकारकडून बुलढाणा जिल्ह्याला वितरित करण्यात येणाऱ्या राशनच्या गव्हाचे गोदाम सील करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकार राशनच्या धान्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. या प्रकारात अद्यापही सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुप्पी सोडली नसल्याने सरकार आणि प्रशासन लोकांपासून काय लपून पाहते असाही सवाल उपस्थित होतोय.
advertisement
टक्कलग्रस्त गावात ज्या ठिकाणावरून गव्हाचे वाटप करण्यात आले होते. त्या ठिकाणी सध्या गहूचे वाटप बंद करण्यात आले असून ज्या वेळी चौकशी करण्यासाठी न्यूज 18 टी टीम पोहचली असता तेथील सुरक्षा रक्षका ने अरेरावी केली . त्यामुळे सरकारला वाचविण्यासाठी हा खटाटोप सुरू होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र शासकीय गोदामात द्रव्य मिश्रित आलेला गहू हा ग्रामस्तांसाठी धोकादायक ठरत आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
February 22, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अख्खं गाव टक्कलं झालं, पाण्यामुळे नाहीतर गव्हामुळे झाला घात; सरकारनेच दिलं खायला विष!


