Buldhana Police : कुंपण जेव्हा शेत खातं! बुलढाण्यात 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून 40 लाख उकळले
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana Police : बुलढाणा जिल्ह्यात खाकी वर्दीतील पोलिसांनीच व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा, 11 सप्टेंबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात खाकीतील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्दीधारी गुन्हेगारी प्रवृत्तीने वागू लागले असतील तर सर्वसामान्यांना न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. बुलढाणा शहर पोलिसांतील 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 जणांनी जालना जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यास फसवून तब्बल 40 लाखांची या व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे.
या लालची पोलिसांनी या व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 लाखांची खंडणी उकळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यामुळे बुलढाणा पोलीस वर्तुळात या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी फरार असून बुलढाणा पोलीस त्यांच्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही आरोप आता बुलढाणा शहर पोलिसांवर होऊ लागला आहे.
advertisement
आरोपींची नावे
1. पोलीस दत्तात्रय नागरे
2. पोलीस गजानन मोरे
3. पोलीस प्रकाश दराडे
4. विशाल मोहिते
5. अजय परदेशी
6. शुभम पांदे
लोणार तालुक्यातील दरोडेखोरांचा धुडगूस
view commentsलोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे 4 सप्टेंबरच्या उत्तररात्री अज्ञात दरोडेखोरांनी धुडघूस घालून चार घरातून ऐवज लंपास केला. चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यालाही दया न दाखवता लुटले. पालखी मार्ग शेगाव – पंढरपूर व सुलतानपुर येथील राज्यमहामार्गापासून नजिकच वडगाव तेजन हे गाव आहे. जालना लाठीमार चे पडसाद उमटलेल्या जिल्ह्यात आंदोलने होत. यामुळे पोलीस यंत्रणा गुंतली आहे. याच फायदा येथे 4 सप्टेंबरच्या उत्तररात्री सुसज्ज टोळीने ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचा फायदा घेतला. रस्त्यावरच असलेल्या घरावर शेतकरी रामकिसन रामराव तेजनकर (65)यांच्या घरात प्रवेश करून दोघेही पती-पत्नीला बांधून ठेवले. नंतर दोघांच्या गळ्याला चाकू लावून तोंडात बोळा कोंबला. त्यांच्याकडे मिळेल तो ऐवज व रोख घेऊन चोरटे व घरात असलेले पैसे व दागिने घेऊन पसार झाले.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 11, 2023 9:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Police : कुंपण जेव्हा शेत खातं! बुलढाण्यात 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून 40 लाख उकळले


