Hyderabad : बिर्याणीसोबत मागितला रायता, रेस्टॉरंटमध्ये केली बेदम मारहाण; ग्राहकाचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला एका खोलीत नेलं आणि खोली आतून बंद करत मारहाण केली. या गोंधळात कुणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हैदराबाद, 11 सप्टेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा रायता मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली. यात ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. पंजागुट्टा भागात असलेल्या मेरिडियन बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. मृत्यू झालेल्या ग्राहकाचे नाव लियाकत असलं असल्याचं समोर आलंय.
लियाकत रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याने बिर्याणीची ऑर्डर दिली होती. जेव्हा बिर्याणी वाढण्यात आली तेव्हा रायता नसल्याचं दिसलं. स्टाफकडे रायता मागितला असता तो देण्यास नकार दिला गेला. ग्राहक पुन्हा पुन्हा रायता मागत राहिला. यामुळे रेस्टॉरंट स्टाफ आणि मालक यांच्यासोबत ग्राहकाचा वादही झाला.
advertisement
रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला एका खोलीत नेलं आणि खोली आतून बंद करत मारहाण केली. या गोंधळात कुणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी ग्राहकाला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकऱणी पोलिसांनी तपास सुरू केला असून रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासत आहेत.
advertisement
ग्राहकाला मारहाणीची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाली. या रेस्टॉरंटमध्ये ही घडलेली पहिलीच घटना नाहीय. स्थानिकांनी सांगितले की, इथे अनेकदा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. हॉटेल स्टाफकडून सातत्याने अशी अरेरावी केली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 11, 2023 3:19 PM IST
मराठी बातम्या/देश/
Hyderabad : बिर्याणीसोबत मागितला रायता, रेस्टॉरंटमध्ये केली बेदम मारहाण; ग्राहकाचा मृत्यू









