केस गळतीनंतर बुलढाण्यात नव्या आजाराची एन्ट्री, लोकांना होतोय 'हा' त्रास
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Buldhana Hair Loss News: गेल्या काही दिवसांत बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. केसगळतीमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण असताना आता बुलढाण्यात नव्या आजारानं एन्ट्री केली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. शेगावसह आसपासच्या गावातील अनेक लोकांची केसगळती झाली आहे. आता हा आजार काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं सांगितलं जातंय. ज्या लोकांची केस गळती झाली होती, त्या लोकांना पुन्हा केस यायला सुरुवात झाल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येतंय. हा आजार कमी होतोय, न होतोय, तोपर्यंत बुलढाण्यात नव्या आजारानं एन्ट्री केल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात येतोय.
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती लागली आहे. केस गळतीचे नेमके कारण अद्याप शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं नाही, अशातच आता केस गळती झालेल्या नागरिकांची दृष्टी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. या केस गळतीमुळे तर या लोकांच्या दृष्टीवर परिणाम झाला नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केलाय जातोय.
advertisement
दुसरीकडे, बुलढाण्यातील केस गळतीवर आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपचारानंतर केस गळती बाधित रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम झाला का? असाही एक संशय व्यक्त केला जातोय. पण केस गळती झालेल्या रुग्णांची दृष्टी कमी होण्यामागं नेमकं काय कारण आहे, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पण आरोग्य यंत्रणेने केस गळतीचे नेमके कारण शोधून काढावं. तसेच केस गळतीच्या रुग्णांना सुरू झालेल्या दृष्टी दोषावर लवकरात लवकर उपचार करावेत, अशी मागणी गावकरी करत आहे.
advertisement
खरं तर, केस गळतीच्या आजारामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावं आधीच दहशतीखाली जगत आहेत. केस गळतीच्या भीतीने अनेकांनी अंघोळ करणं सोडलं आहे. शिवाय या गावांमध्ये लग्न जुळवायला देखील लोक घाबरत आहेत. अनेकांची लग्न पुढं ढकलल्याची माहिती आहे. केस गळतीच्या आजारामुळे लोकांचं टक्कल पडत आहेच, पण जुळलेली लग्न मोडत असल्याने अनेकांची संसार लग्नाआधीच उद्ध्वस्त होत आहेत. आता येथील लोकांना दृष्टी दोषाणाचा आजार सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती वाढली आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 30, 2025 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
केस गळतीनंतर बुलढाण्यात नव्या आजाराची एन्ट्री, लोकांना होतोय 'हा' त्रास


