Crime News : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती? पंकज देशमुखची आत्महत्या की घातपात? पत्नीकडून CID चौकशीची मागणी!

Last Updated:

Pankaj Deshmukh Death mystery : पंकज देशमुख 22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता आणि जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांचा वाहन चालक होता. त्यामुळे आता या प्रकरणाने मृत्यूचं गुढ वाढलं आहे.

Pankaj Deshmukh Death mystery
Pankaj Deshmukh Death mystery
Pankaj Deshmukh Death Case : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता आणि भाजपा आमदार संजय कुटे यांचा वाहन चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आल आहे. गेल्या 3 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत व संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर आणि मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या. जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाच शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं असं असलं तरी पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चाही जळगाव जामोद परिसरात होत होती. मात्र, आता पंकज देशमुखच्या पत्नीने सनसनाटी आरोप केले आहेत.

पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करा

पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती आणि बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची तक्रार केली आहे. सोबतच जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून जळगाव जामोद पोलिसांवर माझा विश्वास नाही अस स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे माझ्या पत्नीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळाल आहे. पंकज देशमुख हा गेल्या 22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता व जळगाव जामोद चे भाजपा आ. संजय कुटे यांचा वाहन चालक असल्याने त्यामुळे सुनिता देशमुख यांना नेमका कुणावर संशय आहे? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement

बुलढाण्यात मस्साजोग..?

जळगाव जामोद पोलिसांवर सुनीता देशमुख यांचा विश्वास का नाही? पंकज देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं सुनीता देशमुख यांना का वाटतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता बुलढाण्यातही तसेच काही घडतं आहे का? याचा शोध घेण्याचं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे.
advertisement

मृतकाच्या पत्नीची मुख्यमंत्री यांना भावनिक पोस्ट

भाजपा कार्यकर्ता आणि आ. संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पत्नी सुनीता देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे. मुख्यमंत्री साहेब पहेलगामच्या भगिनिंच कुंकू पुसल म्हणून "ऑपरेशन सिंदुर " राबवलं. इथे भाजपा कार्यकर्त्यांच्या पत्नीचं सिन्दुर दररोज पुसल्या जातंय त्यासाठी काय करणार? असा सवाल सुनीता देशमुख यांनी विचारला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Crime News : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती? पंकज देशमुखची आत्महत्या की घातपात? पत्नीकडून CID चौकशीची मागणी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement