Buldana Crime : 'माझ्या बहिणीशी का बोलतो'? घरात घुसून जाब विचारत घेतला तरुणाचा जीव, बुलढाण्यातील घटना

Last Updated:

तू माझ्या बहिणीसोबत फोनवर का बोलला? असं विचारत एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. तरुणीच्या भावाने फोनवर बोलल्याच्या कारणावरून एका दिव्यांग युवकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली

घरात घुसून युवकाला केली मारहाण
घरात घुसून युवकाला केली मारहाण
राहुल खंडारे, बुलढाणा 27 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात काही हत्येच्या घटनांमागील अशी कारणं समोर येतात, जी ऐकून सगळेच हैराण होतात. अगदी क्षुल्लक कारणावरुन हत्या केल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. आता अशीच आणखी एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चावरा इलोरा या गावामधून समोर आली आहे.
तू माझ्या बहिणीसोबत फोनवर का बोलला? असं विचारत एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. तरुणीच्या भावाने फोनवर बोलल्याच्या कारणावरून एका दिव्यांग युवकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश सोळंके असं मृत युवकाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
या घटनेनंतर मृतक तरुण आकाश सोळंकेचे वडील गोकुळ सोळंके यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी चावरा येथील आरोपी अर्जुन सोनोने आणि राजेश सोनोने यांच्या विरोधात कलम 302, 34 भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत
advertisement
आकाश आरोपीच्या बहिणीसोबत फोनवर बोलायचा. हे आरोपीला आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने आकाशच्या घरात घुसून त्याला बहिणीशी फोनवर का बोलतो? असं विचारत बेदम मारहाण केली. यावेळी आकाशचे आई वडील शेतात गेले होते. संध्याकाळी घरी परत आले असता त्यांना आकाश जखमी अवस्थेत पडलेला दिसला. आई-वडिलांनी आकाशला विचारणा केली. यावेळी त्याने गावातील अर्जुन सोनोने आणि राजेश सोनोने या दोघांनी बेदम मारहाण केल्याचं सांगितलं. आकाशला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, या मारहाणीत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldana Crime : 'माझ्या बहिणीशी का बोलतो'? घरात घुसून जाब विचारत घेतला तरुणाचा जीव, बुलढाण्यातील घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement