नराधमांनी हद्दच केली! मुंडकं अन् हातच नाही तर प्रायव्हेट पार्टही कापला, माजी सरपंचाच्या मुलाचा गंभीर आरोप

Last Updated:

Ashok Sonune Murder Case : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याच्या वढव माजी सरपंच अशोक सोनूने हत्याकांड प्रकरणी महिना उलटून गेला असून कठोर भूमिका पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप करत मृतकांच्या मुलाने गंभीर आरोप केले आहेत.

Buldhana Crime Ashok Sonune Murder Case
Buldhana Crime Ashok Sonune Murder Case
Buldhana Ashok Sonune Murder Case : गेल्या दोन महिन्यापूर्वी अपहरण करून माजी सरपंच अशोक सोनूने यांची हत्या करण्यात आली होती. गेल्या 10 जून रोजी त्यांचा मृतदेह मुंडके आणि दोन्ही हात नसलेल्या कुजलेल्या अवस्थेत लोणार शहरालगत आढळून आला होता. या घटनेला देखील आता महिना लोटत असून पोलिसांनी थरूर मातूर कारवाई केली असल्याने संताप व्यक्त केला जातोय. अशातच आता विधानसभेत या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच आता अशोक सोनुने यांच्या मुलाने खळबळजनक आरोप केला आहे.

प्रायव्हेट पार्ट देखील कापला

जुन्या वादातून हे हत्याकांड घडवलं गेलं असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जातोय. माजी सरपंच अशोक सोनुने यांच्या जीवाला धोका असल्याबाबत अनेक वेळा लोणार पोलिसांना कळवलं होतं तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने हे हत्याकांड घडलं आहे. त्यानंतरही अजूनही या प्रकरणात सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय. हे प्रकरणातील फरार आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच मुंडक कापून दोन्ही हात कापत प्रायव्हेट पार्ट ही कापला गेला, असा गंभीर आरोप मृतकांच्या मुलाने केला आहे.
advertisement

पोलीस प्रशासनाला जाग कधी येणार?

पीडित कुटुंबीयातील आणखी काही लोकांचे जीव गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल भाई दीपक केदार यांच्याकडून उपस्थित केला जातोय. पीडित कुटुंबियांनी पॅंथर सेनेच्या दीपक केदार यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे. पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी या प्रकरणात आता उडी घेतली आहे.
advertisement

पोलिसांची भूमिका संशयास्पद

या घटनेला देखील आता महिना लोटत असून अद्यापही आरोपी मोकाट असल्याने संता व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जुन्या वादातून हे हत्याकांड घडवलं गेलं असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जातोय.. माजी सरपंच अशोक सोनुने यांच्या जीवाला धोका असल्याबाबत अनेक वेळा लोणार पोलिसांना कळवलं होतं तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने हे हत्याकांड घडलं आहे. त्यानंतरही अजूनही या प्रकरणात सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय.
advertisement

पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका

दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पीडित कुटुंबीयातील आणखी काही लोकांचे जीव गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल भाई दीपक केदार यांच्याकडून उपस्थित केला जातोय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
नराधमांनी हद्दच केली! मुंडकं अन् हातच नाही तर प्रायव्हेट पार्टही कापला, माजी सरपंचाच्या मुलाचा गंभीर आरोप
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement