प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देण्याच्या बहाण्याने शिक्षकाचा 16 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार! रूमवर नेलं, व्हिडीओ कॉल केला अन्...

Last Updated:

Buldhana Crime News : प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्याचे तसेच अभ्यासाचे काही साहित्य देण्याचे आमिष दाखवून आरोपीने 16 वर्षीय पीडित विद्यार्थिनीला बोलावून घेतले.

Buldhana Crime Teacher Abuse 16 year old student
Buldhana Crime Teacher Abuse 16 year old student
Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका शिक्षण व्यवसायाला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या या गंभीर प्रकरणात एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या 16 वर्षीय मुलीलाही आरोपी करण्यात आले आहे. मलकापूर तालुक्यात एका शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

विद्यार्थिनीला मलकापूर तहसील चौकात बोलावलं

आरोपी शिक्षकाचे नाव मुकेश परमसिंग रबडे (वय 40) असून, तो मोताळा तालुक्यातील रहिवासी आहे. पीडित विद्यार्थिनी त्याला ओळखत होती. प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्याचे तसेच अभ्यासाचे काही साहित्य देण्याचे आमिष दाखवून आरोपीने 28 ऑक्टोबर रोजी 16 वर्षीय पीडित विद्यार्थिनीला मलकापूर तहसील चौकात बोलावून घेतले.

मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून...

advertisement
तहसील चौकातून त्याने मुलीला एका रूमवर नेले. तिथे नेऊन आरोपी शिक्षकाने जबरदस्तीने मुलीवर अत्याचार केला. या गुन्ह्यामध्ये त्याने पीडितेच्या मैत्रिणीचाही वापर केला. त्याने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून सुरू असलेल्या अत्याचाराचे रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आणि तिने त्याप्रमाणे चित्रण केले. अत्याचाराला विरोध करणाऱ्या पीडितेला आरोपीने मारहाण देखील केली होती.

16 वर्षीय मैत्रिणीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

advertisement
नंतर याच शिक्षकाने पीडितेशी पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर, पीडितेच्या मैत्रिणीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल केला, ज्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षक मुकेश रबडे आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या 16 वर्षीय मैत्रिणीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देण्याच्या बहाण्याने शिक्षकाचा 16 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार! रूमवर नेलं, व्हिडीओ कॉल केला अन्...
Next Article
advertisement
Uddhav Thackeray: कामगार संघटना वादामुळे ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड
ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड
  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

View All
advertisement