Dahihandi : अशी फोडता का दहीहंडी? गोविंदाचा नको तो नाद चिमुकलीच्या जीवावर; बुलडाण्यातला हृदयद्रावक VIDEO समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
दहीहंडी फोडताना गोविंदाने एक चूक केली आणि त्याचा बळी ठरली एक चिमुकली.
राहुल खंडारे/बुलडाणा, 7 सप्टेंबर : कृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली. सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. ‘गोविंदा आला रे आला’चा गजर गल्लीबोळात ऐकू आला. पण याच उत्साहात बुलडाण्यात मात्र धक्कादायक घटना घडली. दहीहंडी फोडताना गोविंदाचा नको तो नाद चिमुकलीच्या जीवावर बेतला. या भयंकर घटनेचा हृदयद्रावर व्हिडीओ समोर आला आहे.
देऊळगाव राजा इथल्या मानसिंग पुरा इथली ही घटना. दहीहंडी उत्सवात झालेल्या अपघातात एक चिमुकली जागीच ठार झाली आहे तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दहीहंडीसाठी एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा आले. एक गोविंदा वर चढला. पण दहीहंडी फोडण्यासाठी त्याने जी पद्धत वापरली त्यामुळे या मुलीचा जीव गेला.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता गोविंदा थर रचतात पण त्यांची उंची काही त्या दहीहंडीपर्यंत पोहोचली नाही. मग गोविंदाने एक दोर घेतला आणि तो दहीहंडीवर फेकला. त्याने दहीहंडी बांधलेला दोर दुसऱ्या दोरीने खाली खेचला. गोविंदाही त्या दहीहंडीला लटकला. कसाबसा तो त्या दहीहंडीसह खाली आला आणि त्याने दहीहंडी फोडली. सर्वांना लटकलेल्या गोविंदाची चिंता वाटू लागली म्हणून सर्वजण त्याच्या भोवती जमले. पण त्याच क्षणी दुसरीकडे ज्या गॅलरीला दहीहंडी बांधली होती ती गॅलरी दहीहंडीचा दोर खाली खेचल्याने कोसळली.
advertisement
तिथंच खाली या दोन चिमुकल्या दहीहंडी पाहण्यासाठी उभ्या होत्या. निदा रशीद खान पठाण (वय 9 वर्ष) आणि अल्फिया शेख हाफिज (वय 8) अशी या चिमुकलींची नावं. निदा जागीच ठार झाली. तर अल्फियाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली.
advertisement
प्रथमोपचारनंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले तर मृतक निदा पठाण हिस ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी हलवण्यात आलं होतं.
दहीहंडीचा नाद झाला, 8 वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतला, हृदयद्रावक VIDEO समोर#Dahihandi pic.twitter.com/6sneyLAmhT
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2023
जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Sep 07, 2023 11:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Dahihandi : अशी फोडता का दहीहंडी? गोविंदाचा नको तो नाद चिमुकलीच्या जीवावर; बुलडाण्यातला हृदयद्रावक VIDEO समोर









