गोविंदा आला रे.. बाळगोपाळांनी फोडली खास खेळणी दहीहंडी, पाहा video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यामध्ये एक अनोखी चिमूरड्या मावळ्यांची खेळणीची दहीहंडी साजरी करण्यात आली आहे.
पुणे, 7 सप्टेंबर : महाराष्ट्रमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. बघायला गेलं तर दहीहंडीमध्ये मोठ मोठ्या आवाजात डीजे वाजवले जातात प्रमुख आकर्षण म्हणून अनेक सेलिब्रिटीजला बोलवले जाते आणि यातच मोठ्या गर्दीत दहीहंडी साजरी होते. पण अशातच पुण्यामध्ये एक अनोखी चिमूरड्या मावळ्यांची खेळणीची दहीहंडी साजरी करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये बालगोपाळ आणि छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव बालगोपाळ खेळणी दहीहंडीचे आयोजन केले होते. मावळा पगडी परिधान केलेले शालेय विद्यार्थी आणि बाळगोपाळांनी ही हंडी फोडली.
‘गोविंदा रे गोपाळा…’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; चिमुरडी बनली कृष्ण Video
आपल्या मुलांना खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, या उद्देशाने बनवलेल्या मावळा या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. यासह रुद्रांग वाद्यपथक (ट्रस्ट) आणि आवर्तन ढोल ताशा पथक आणि पुणे यांचे बहारदार वादनाने खेळणी दहीहंडी उत्सवाला साज चढला.
advertisement
महाराष्ट्रातील एकमेव अंध गोविंदा पथकाने लावला दहीहंडीचा थर; असा रंगला थरार
view commentsसमाजभूषण स्वर्गीय बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे आणि देशभक्त केशवराव उर्फ तात्यासाहेब जेधे यांचा वारसा पुढे चालवत असताना दहीहंडी उत्सव मुलांसोबत साजरा करावा, या विचाराने ही वेगळी बालगोपाळ खेळणी दहीहंडी आयोजिली होती. यामध्ये 100 ते 150 प्रकारच्या दीड हजारांहून अधिक खेळणीचा समावेश होता. ही खेळणी अनाथ मुलांच्या संस्थांमध्ये, तसेच दुर्गम भागातील मुलांना वाटण्यात आली. शिवाजी महाराज मुलांना समजावेत, यासाठी मावळा खेळ खूपच उपयुक्त आहे, असं आयोजक कान्होजी जेधे यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2023 7:55 PM IST

