बायको असताना तरुणीसोबत लफडं, लव्ह ट्रँगलमधून क्लास वन ऑफिसरला घरात घुसून धुतलं, बुलढाण्यातील घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा शहरातील हिरोळे गॅस एजन्सी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं प्रेमाच्या त्रिकोणातून एका क्लास वन ऑफिसरला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा शहरातील हिरोळे गॅस एजन्सी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं प्रेमाच्या त्रिकोणातून एका क्लास वन ऑफिसरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका युवतीसह इतर दोन जणांनी फ्लॅटमध्ये घुसून ही मारहाण केली आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानंतर शेजाऱ्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. घटनेचा पुढील तपास केला जातोय.
अमोल गिते असं मारहाण झालेल्या क्लास वन अधिकाऱ्याचं नाव आहे. ते जिल्हा आरोग्य अधिकारी असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ते प्रमुख आहेत. ज्यावेळी गिते यांना फ्लॅटमध्ये मारहाण होत होती, त्यावेळी शेजाऱ्याने 112 वर कॉल करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, तिन्ही आरोपींसह अमोल गिते यांना पोलीस ठाण्यात आणलं. आणि सर्वांना समज देऊन सोडण्यात आलं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अमोल गिते हे बुलढाणा शहरातील हिरोळे गॅस एजन्सीसमोरील आपल्या फ्लॅटमध्ये एका युवतीसोबत होते. रात्री उशिरा संबंधित युवती आणि गिते यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर संबंधित तरुणाने दोन जणांना घटनास्थळी बोलवून घेतलं. यानंतर युवतीसह इतर दोन जणांनी अमोल गिते यांना बेदम मारहाण केली.
advertisement
रात्री उशिरा फ्लॅटवर सुरू असलेला गोंधळ पाहून शेजारी राहणाऱ्या एका नागरिकाने 112 वर पोलिसांना कॉल केल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमोल गीतेंसह चौघांना पोलीस स्टेशनला आणून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे. दरम्यान मारहाण झालेल्या अमोल गीतेची शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. मात्र या प्रकरणाला लव्ह ट्रँगल असल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली नाही. तसेच युवतीवर पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून देखील दबाव आणला गेल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाभरात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 08, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बायको असताना तरुणीसोबत लफडं, लव्ह ट्रँगलमधून क्लास वन ऑफिसरला घरात घुसून धुतलं, बुलढाण्यातील घटना!