Lonar Lake : लोणारला फिरायला जाताय? सुरू करण्यात आली खास सुविधा, असा घ्या लाभ
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आता लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणखी एक नवी आणि आधुनिक सुविधा मिळणार आहे. या उपक्रमामुळे पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
बुलढाणा: आता लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणखी एक नवी आणि आधुनिक सुविधा मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तर्फे लोणार येथे कॅराव्हॅन सेवा सुरू करण्यात आली असून, या उपक्रमामुळे पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तसेच लोणार सरोवराबाबत पर्यटकांचे आकर्षण अधिक वाढण्याची देखील शक्यता आहे.
जगप्रसिद्ध आणि अद्वितीय खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर हे अंदाजे 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे. वैज्ञानिक, धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून या सरोवराचे अनोखे महत्त्व आहे. दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक या नैसर्गिक सरोवराला भेट देतात. मात्र, सरोवर परिसरात फिरण्यासाठी आणि मुक्कामासाठी मर्यादित सुविधा असल्याने काही अडचणी जाणवत होत्या.
advertisement
कॅराव्हॅन म्हणजे पर्यटकांसाठी चालते फिरते महाल
त्या पार्श्वभूमीवर एमटीडीसीने आता कॅराव्हॅन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कॅराव्हॅन म्हणजे एक संपूर्ण सुसज्ज चालते वाहन, ज्यामध्ये राहण्यासाठी प्रशस्त जागा, स्वच्छ वॉशरूम, स्वयंपाकघर, भोजनासाठी व्यवस्था तसेच आवश्यक सर्व आधुनिक सोयी उपलब्ध आहेत. एक प्रकारे हे पर्यटकांसाठी चालते फिरते महाल ठरणार आहे. या वाहनाच्या माध्यमातून पर्यटकांना सरोवराभोवती असलेल्या प्राचीन मंदिरांची, ऐतिहासिक वास्तूंची आणि नैसर्गिक सौंदर्याची फेरी आरामात घेता येईल. पायदळ प्रवासातील थकवा आणि मर्यादा आता या सेवेच्या माध्यमातून दूर होणार आहेत.
advertisement
स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार
या नव्या सेवेमुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. स्थानिक हॉटेल व्यवसाय, मार्गदर्शक, व्यापारी तसेच पर्यटनाशी संबंधित घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. लोणार सरोवर परिसरात याआधी स्वागत केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली होती. आता कॅराव्हॅन उपक्रमामुळे या पर्यटन स्थळाचे आकर्षण आणखी वाढले असून, पर्यटकांना लोणारच्या खाऱ्या सरोवराचा आणि त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक वैभवाचा अधिक सुखद अनुभव घेता येणार आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
October 06, 2025 10:53 AM IST