मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा, मध्यरात्री ICU मध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

Last Updated:

Buldhana Hospital Video viral : मनसेच्या जिल्हाध्यक्षाने खासगी रुग्णालयातील एका ज्युनिअर डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

MNS buldhana hospital video
MNS buldhana hospital video
MNS buldhana hospital video viral : मराठी माणसाच्या मुद्द्यावरून मनसेने मुंबईत आवाज उठवला अन् अख्खा महाराष्ट्रात याची ठिणगी पेटल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलन देखील केलं. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला सहानुभूती मिळत असताना दुसरीकडे आता मनसेच्या जिल्हाध्यक्षाने रुग्णालयात राडा घातल्याचं पहायला मिळालं आहे. बुलढाण्यात रुग्णाला भेटण्याच्या वेळेवरून झालेल्या वादातून मनसेच्या जिल्हाधिकाऱ्याने खासगी रुग्णालयातील एका ज्युनिअर डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता बुलढाण्यात संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण जाधव याने आपल्या मित्रांसह मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयातील एका ज्युनिअर डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाला भेटण्याच्या वेळेवरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

लक्ष्मण जाधव याचा प्रताप

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा गाभणे हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या त्याच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी रुग्णालयातील संबंधित ज्युनिअर डॉक्टरने त्यांना रुग्णाला भेटण्याची विशिष्ट वेळ असते आणि रुग्णांना विश्रांतीची गरज असते, त्यामुळे तुम्ही एकावेळी एकच व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता, असं समजावून सांगितलं. पण डॉक्टरच्या या विनंतीला लक्ष्मण जाधव याने जुमानलं नाही.
advertisement

पाहा VIDEO

डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण

स्वत:सह मित्रांना सर्वांना एकाच वेळी आयसीयूमध्ये जाऊ देण्याची मागणी त्यांनी केली. याच मुद्द्यावरून वाद वाढला आणि लक्ष्मण जाधव याने आयसीयूमध्ये कार्यरत असलेल्या ज्युनिअर डॉक्टरला शिवीगाळ करत जबर मारहाण केली, असा आरोप आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी मेहकर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
advertisement

तातडीने कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासारख्या जबाबदार व्यक्तीकडून एका कार्यरत डॉक्टरला अशा प्रकारे मारहाण केल्याने वैद्यकीय क्षेत्रात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. त्यामुळे आता मनसेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा इशारा इतर पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा, मध्यरात्री ICU मध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement