समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याला लुटलं, चालकच निघाला मास्टरमाइंड, आधी कार थांबवली मग...

Last Updated:

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून चार ते पाच दरोडेखोरांनी सुमारे पावणे पाच किलो सोन्याचे दागिने लुटले. या घटनेत व्यापाऱ्याच्या चालकाचाच हात असल्याची माहिती आता समोर आली आहे. चालकाने कट रचून सोने व्यापाऱ्याला लुटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे सोने व्यापारी अनिल जैन हे खामगाव येथून सोन्याचे दागिने घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यांनी मेहकर इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश केला. याचवेळी, चालकाने पोटदुखीचे कारण सांगून गाडी महामार्गावर थांबवली. गाडी थांबताच, पाठीमागून आलेल्या एका कारमधून चार ते पाच दरोडेखोर खाली उतरले. त्यांनी अनिल जैन यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. याच गोंधळात, चालकाने गाडीतील सोन्याची बॅग उचलली आणि तो दरोडेखोरांसोबत फरार झाला.
advertisement
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महामार्गावर लुटमारीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी मेहकर पोलिसांसह समृद्धी महामार्ग पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे. चालकानेच हा कट रचला असावा, असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याला लुटलं, चालकच निघाला मास्टरमाइंड, आधी कार थांबवली मग...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement