बुलडाण्यातील महिला सरपंचाच्या पतीचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कौलच विकले

Last Updated:

बुलडाणा जिल्ह्यातील निवाना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील मंगलोरी कौल चक्क सरपंच पतीने विकून टाकले.

शाळेवरील मंगलोरी कौल चक्क सरपंच पतीने विकून टाकले (प्रतिकात्मक फोटो)
शाळेवरील मंगलोरी कौल चक्क सरपंच पतीने विकून टाकले (प्रतिकात्मक फोटो)
राहुल खंडारे, बुलडाणा 29 सप्टेंबर : सरपंच गावची जबाबादारी घेतो. तिथे सगळं शांततेत, सुरळित घडेल आणि गावातील नागरिकांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देता याव्या, यासाठी तो प्रयत्न करत असतो. लोकही आपल्या अडचणी आणि समस्या घेऊन सरपंचाकडे पोहोचतात. मात्र, हाच सरपंच गावातील नागरिकांच्या सुविधेच्या वस्तू विकू लागला तर?
हे वाचायला विचित्र वाटत असलं तरी अशीच एक घटना आता समोर आली आहे. ही घटना बुलडाण्यात घडली आहे. यात एका सरपंच पतीने चक्क शाळेवरील कौलच विकले. बुलडाणा जिल्ह्यातील निवाना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील मंगलोरी कौल चक्क सरपंच पतीने विकून टाकले. तशी तक्रार उपसरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे
advertisement
ग्रामपंचायतची कुठल्याच यंत्रणेची परवानगी न घेता आपल्या पत्नीच्या पदाचा दुरुपयोग करून सरपंच पतीने चक्क जिल्हा परिषद शाळेवरील मंगलोरी कौल विकून टाकले आहेत. सदर घटनेची ग्रामसेवकानेदेखील कुठलीच सूचना दिली नाही. त्यामुळे याप्रकरणी संबंधित सरपंच पतीवर आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे
advertisement
गोंदियात जावयानं सासऱ्याचं घर पेटवलं
गोंदियामधूनही एक विचित्र घटना समोर आली होती. यात रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. जावयानं सासऱ्याचं घर जाळल्याची घटना गोंदियामधून समोर आली. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्राम डवकी गावात जावयानेच आपल्या सासरच्या घराला आग लावली वेळेवर आग विझविण्यात आली मात्र या आगीत मोटारसायकल जळाली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलडाण्यातील महिला सरपंचाच्या पतीचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कौलच विकले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement