'भाऊ सोयाबीनला भाव मिळून द्या' चिमुकल्याचं तुपकरांना भावनिक पत्र, खाऊचे पैसेही दिले मोर्चाला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सध्या रविकांत तुपकर 'एल्गार रथयात्रे'च्या माध्यमातून जिल्हाभर फिरत आहेत. याचवेळी एका चिमुकल्यानं त्यांना भावनिक पत्र लिहीलं आहे.
बुलढाणा, 13 नोव्हेंबर, राहुल खंडारे : 'मला यंदा दिवाळीला नवीन कपडे व खाऊ नको, आपल्या सोयाबीनला भाव हवा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावासाठी लढणारे रविकांतभाऊ तुपकर यांच्या एल्गार मोर्चासाठी मी हे पैसे देणार आहे. रविकांतभाऊ तुम्ही सरकारच्या धोरणा विरोधात लढा आणि आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या', असे भावनिक पत्र इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या आयुष गोपाल सुरडकर या चिमुकल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लिहिले आहे. नुसतेच पत्र लिहून तो थांबला नाही तर त्याने दोन हजार रुपये त्याच्या वडिलांना रविकांत तुपकर यांना पाठविण्यास भाग पाडले आहे.
सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सध्या रविकांत तुपकर 'एल्गार रथयात्रे'च्या माध्यमातून जिल्हाभर फिरत आहेत. मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथे रविकांत तुपकर यांची सभा झाली होती. या सभेला गावातील शेतकऱ्यांसोबत गोपाल सुरडकर हे शेतकरी व त्यांचा इयत्ता चौथीतील मुलगा आयुष देखील उपस्थित होता. या सभेनंतर या चिमुकल्यानं रविकांत तुपकर यांना पत्र लिहीलं आहे.
advertisement
या पत्रात चिमुकल्यानं म्हटलं की, 'मला यंदा दिवाळीला नवीन कपडे व खाऊ नको, आपल्या सोयाबीनला भाव हवा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावासाठी लढणारे रविकांतभाऊ तुपकर यांच्या एल्गार मोर्चासाठी मी हे पैसे देणार आहे. रविकांतभाऊ तुम्ही सरकारच्या धोरणा विरोधात लढा आणि आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या'
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
November 13, 2023 1:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
'भाऊ सोयाबीनला भाव मिळून द्या' चिमुकल्याचं तुपकरांना भावनिक पत्र, खाऊचे पैसेही दिले मोर्चाला


