वटपौर्णिमेच्या दिवशीच हरपलं सौभ्याग्य, पोलीस पत्नीवर दुर्दैवी वेळ, त्या घटनेनं सारं संपलं!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vat Purnima 2025: ऐन वटपौर्णिमेच्या दिवशीच बुलढाण्यातील पोलीस पत्नीवर पतीला गमावण्याची दुर्दैवी वेळ आलीये. मुलाच्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच काळाने घाला घातला.
जालना: वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटवृक्षाला साकडे घालतात. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस पत्नीवर वटपौर्णिमेच्या दिवशीच आपल्या पतीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आलीये. मुंबई येथे झालेल्या लोकल ट्रेन दुर्घटनेत जुमडा येथील विकी बाबासाहेब मुख्यदल यांचा दुर्दैवी अंत झाला. विकी यांच्या अपघाती निधनाने मुख्यदल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विकी मुख्यदल हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा या गावचे रहिवाशी होते. मागील सात वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. रेल्वे विभागात कार्यरत असतानाच ते कामावरून परतत होते. तेव्हा झालेल्या दुर्दैवी अपघातात विकी यांचा मृत्यू झाला. आज, 10 जून रोजी सकाळी त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
advertisement
विकी यांचा वाढदिवस दोन-तीन दिवसाआधीच झाला होता. तर त्यांच्या चार वर्षाच्या मुलाचा 17 जून रोजी वाढदिवस आहे. त्यासाठी विकी आणि त्यांच्या पत्नीने जय्यत तयारी केली होती. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सासू-सासर्यांना मुंबईत बोलवलं होतं. मुलाच्या वाढदिवसा आधीच विकी यांच्यावर काळाने घाला घातल्याने मुलगा अनाथ तर पत्नी दीपाली आधारहीन झाल्या.
advertisement
सगळं तसंच राहिलं.
“रात्री दोन वाजता विकी हे ड्युटीसाठी गेले होते. काम आटोपून सकाळी ते घराकडे निघाले होते. मी घरी येतोय काय आणायचं असं त्यांनी फोनवर विचारलं होतं. 17 तारखेला मुलाचा वाढदिवस असल्याने आम्ही त्याची पूर्ण तयारी केली होती. गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बाहेर शॉपिंगसाठी जाणार होतो. परंतु त्यांच्या जाण्याने सगळं जागच्या जागीच राहिले, अशा शब्दांत पत्नी दीपाली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Jun 10, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
वटपौर्णिमेच्या दिवशीच हरपलं सौभ्याग्य, पोलीस पत्नीवर दुर्दैवी वेळ, त्या घटनेनं सारं संपलं!








