काय सांगताय ! अख्खं गाव बसलं उपोषणाला; मुलं, जनावरे घेऊन गावकऱ्यांचं आमरण उपोषण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अख्ख गावच उपोषणाला बसल आहे. पुरामुळे जळगाव जामोद तालुक्यातील या गावाला जोरदार तडाखा बसला. यामुळे नागरिकांचं भरपूर नुकसान झालं.
राहुल खंडारे, 14 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अख्ख गावच उपोषणाला बसल आहे. पळशी वैद्य आणि पळशी घाट या गावातील गावकरी आपल्या लेकर बायांना घेऊन, जनावरांना घेऊन आमरण उपोषण करत आहेत. गेल्या 22 तारखेला आलेल्या पुरामुळे जळगाव जामोद तालुक्यातील या गावाला जोरदार तडाखा बसला. यामुळे नागरिकांचं भरपूर नुकसान झालं.
गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरलं. धान्य वाहून गेलं, कपडे वाहून गेले. पुराच्या पाण्याने होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे पुराच्या तडाख्यातून गाव कसंतरी वाचलं. मात्र हे गाव जिगाव प्रकल्पाच्या पुढील क्षेत्रात येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या गावाच्या पुनर्वसनासाठी कुठल्याच हालचाली प्रशासकीय पातळ्यांवर झाल्या नाहीत. त्यामुळे जिगाव धरण क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या या गावाचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि गावाला धरणग्रस्त म्हणून जाहीर करावं. यासाठी हे गावकरी उपोषणाला बसले आहेत.
advertisement
गावकरी महिला, पुरुषांनी सांगितलं, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात आलेल्या पावसानं परिसरातील सर्वच नद्यांना महापूर आला. या महापुराचे पाणी अनेक गावात शिरलं. अनेक ठिकाणी घरे वाहून गेली, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य, अन्नधान्य, कपडे वाहून गेले. अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत हे गावकरी आहे. जिगाव धरण क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात येणार हे गाव पुनर्वसित करावे ही मागणी घेऊन संपूर्ण गावकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.. यावेळी पुराच्या तडाख्यातून वाचल्यानंतर सरकार आमचं गाऱ्हाणं ऐकून घेणार आहे की नाही असा उद्विग्न प्रश्न विचारात एका आजीबाईंना उपोषण मंडपातच हंबरडा फोडला..
advertisement
वयोवृद्ध, लहान मुले, इतकंच काय तर जनावरांना घेऊन गावकरी उद्याच्या पिढीची बरबादी होण्यापासून रोखण्यासाठी एकत्र आलेत. सरकार आणि प्रशासनाशी दोन हात करण्याच्या तयारीत हे गावकरी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणावर बसलेत. झोपेत असलेले सरकार गावकऱ्यांच्या या उपोषणानंतरही जाग होणार आहे की नाही ? हाच खरा प्रश्न या गावकरी विचारत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2023 4:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
काय सांगताय ! अख्खं गाव बसलं उपोषणाला; मुलं, जनावरे घेऊन गावकऱ्यांचं आमरण उपोषण


