टोमॅटोनं शेतकरी झाले करोडपती, पण दुसरीकडे हाताशी आलेल्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर, असं काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कुणी ट्रॅक्टर फिरवला तर कुणी हातानं उपटली कपाशी, शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी अविनाश कानडजे : देशात एकीकडे शेतकरी टोमॅटो विकून करोडपती होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला आहे. एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कपाशीवर रोगराई आल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. बुलढाण्यात शेतकऱ्याने कपाशीवर ट्रॅक्टर फिरवला तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर भागात शेतकऱ्याने कपाशीचं पिक उपटून टाकलं.
सोयगाव तालुक्यातील घोसला येथील पिंटू गव्हांडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात सिंचनवर लागवड केलेली पाच एकर क्षेत्रातील कपाशी वाढ खुंटल्याने आणि लाल पडून मर होत असल्याने उपटून फेकली आहे.
सोयगाव तालुक्यात कपाशी वाढ आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. औषध खताचा आणि पाण्याचा खर्च करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच न आल्याने शेतकरी हवालदिन झाले आहेत.
advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकऱ्याने कपाशीचं पीक उपटून टाकलं आहे. शेतकरी शैलेंद्र बिल्लारे या शेतकऱ्याने आपल्या साडेचार एकर शेतात लावलेल्या कपाशीमध्ये ट्रॅक्टर घालून कपाशीचं पीक नष्ट केलं. खामगाव, नांदुरा, जळगाव जामोदसह इतर तालुक्यात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची वाढ थांबली.
कपाशीवर लाखो रुपये खर्च करून काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी कपाशी उपटून टाकली तर काहींनी ट्रॅक्टर किंवा जनावरे घातली आहेत.
advertisement
खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिलारे यांनी सुद्धा साडेचार एकर मध्ये कपाशी लावली होती. लाखो रुपये त्यावर खर्च केला, कपाशी जोमात असताना त्यावर लाल्या रोग झाला आणि हातातोंडाशी आलेला घास गेला. कपाशीवर ट्रॅक्टर फिरवावा लागला, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 14, 2023 4:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टोमॅटोनं शेतकरी झाले करोडपती, पण दुसरीकडे हाताशी आलेल्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर, असं काय घडलं?


