Railway Update: प्रवाशांसाठी विशेष बोनस! मध्य रेल्वेने या गाड्यांचा कालावधी वाढवला, वाचा A टू Z माहिती

Last Updated:

सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो प्रवाशांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

Railway Update: प्रवाशांसाठी विशेष बोनस! मध्य रेल्वेने या गाड्यांचा कालावधी वाढवला, वाचा A टू Z माहिती
Railway Update: प्रवाशांसाठी विशेष बोनस! मध्य रेल्वेने या गाड्यांचा कालावधी वाढवला, वाचा A टू Z माहिती
मुंबई: सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो प्रवाशांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेन क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर, ट्रेन क्रमांक 01435 सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या 13 फेऱ्यांचा कालावधी 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
दैनंदिन अनारक्षित गाड्यांपैकी खाली दिलेल्या गाड्यांचा कालावधी 1 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रत्येक गाडीच्या 92 फेऱ्या वाढवण्यात आल्या असून याचा लाभ रोजच्या प्रवासासाठी होणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 01461/01462: सोलापूर-दौंड-सोलापूर
गाडी क्रमांक 01465/01466: सोलापूर-कलबुर्गी-सोलापूर
गाडी क्रमांक 01023/01024: पुणे-कोल्हापूर-पुणे
गाडी क्रमांक 01211/01212: बडनेरा-नाशिकरोड-बडनेरा
गाडी क्रमांक 01487/01488: पुणे-हरंगुळ-पुणे
तसेच, गाडी क्रमांक 01437 सोलापूर-धर्मावरम विशेष गाडी 9 ऑक्टोबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत धावेल आणि गाडी क्रमांक 01438 धर्मावरम-सोलापूर गाडी 11 ऑक्टोबरपासून 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत धावणार आहे. या गाड्यांचा मार्ग अनकापल्लेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
advertisement
खालील गाड्यांना मुरुड स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे
ट्रेन क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर एक्सप्रेस रात्री 10 वाजून 4 मिनिटांनी
ट्रेन क्रमांक 01435 सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस संध्याकाळी 6 वाजता
ट्रेन क्रमांक 01487 पुणे-हरंगुळ एक्सप्रेस सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी
ट्रेन क्रमांक 01488 हरंगुळ-पुणे एक्सप्रेस दुपारी 3 वाजून 19 मिनिटांनी
आरक्षण: विशेष गाड्या क्रमांक 01435, 01436, 01437, 01024, 01487 आणि 01488 च्या वाढविण्यात आलेल्या फेऱ्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळ www.irctc.co.in वर आरक्षण उपलब्ध आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Update: प्रवाशांसाठी विशेष बोनस! मध्य रेल्वेने या गाड्यांचा कालावधी वाढवला, वाचा A टू Z माहिती
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement