advertisement

नीट परीक्षेत यश पण अभ्यासाचा दबाव, डॉक्टर व्हायचं नाही, चिठ्ठी लिहून अनुरागचं टोकाचं पाऊल

Last Updated:

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले.

युवकाचे टोकाचे पाऊल
युवकाचे टोकाचे पाऊल
हैदर शेख, प्रतिनिधी, चंद्रपूर : नीट परीक्षेत यश मिळविल्यानंतरही डॉक्टर व्हायचे नसल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे युवकाने जीवन संपवले. अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले. मृतक अनुराग बोरकर याने नीट यूजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून १४७५ वी रँक पटकाविली होती.
आत्महत्येच्या ठिकाणी अनुरागने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यामध्ये मला डॉक्टर व्हायचे नाहीये, असे त्याने लिहिले होते. अभ्यासाचा दबाव आणि भीती यामुळे त्याने जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
advertisement
निकालानंतर अनुरागच्या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. त्याला आज एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतु राहते घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नीट परीक्षेत यश पण अभ्यासाचा दबाव, डॉक्टर व्हायचं नाही, चिठ्ठी लिहून अनुरागचं टोकाचं पाऊल
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement