Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, शरिरावर सपासप वार, चंद्रपूर हादरलं
- Published by:Shreyas
Last Updated:
चंद्रपूर शहरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निघृण हत्या करण्यात आली आहे. उच्चभ्रू अशा सरकारनगर भागात युवासेनेच्या शहरप्रमुखावर चाकूने सपासप वार करण्यात आले.
हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उच्चभ्रू अशा सरकारनगर भागात युवासेनेच्या शहरप्रमुखावर चाकूने सपासप वार करण्यात आले. शिवा वझरकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 30 वर्षांच्या शिवा वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
advertisement
शिवा वझरकरची हत्या झाल्याचं समजताच त्याच्या समर्थकांनी संशयित आरोपीचे जेसीबी आणि वाहनांची मोडतोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकरचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला आहे.
advertisement
उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत रुपांतर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून केली जात आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
January 25, 2024 11:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, शरिरावर सपासप वार, चंद्रपूर हादरलं