'अचानक बस दरीत जाऊ लागली अन्...' चालकाचा मृत्यू पण 22 महिलांचा जीव एका झाडानं कसा वाचला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

Last Updated:

ज्या क्षणी सारं संपणार असं वाटतं तिथेच जीव वाचण्यासाठी एक आशेचा किरण दिसतो. अगदी तसंच काहीसं या महिलांसोबत घडलं आहे. एक दोन नाही तर तब्बल 22 महिलांसोबत हे घडलं आहे.

News18
News18
जगण्यासाठी हिंमत लागते त्याहीपेक्षा जास्त डोळ्यासमोर मृत्यू पाहण्यासाठी मन अधिक कठोर करावं लागतं, डोळ्यादेखत आपला मृत्यू समोर दिसत असताना अंगाचा थरकाप उडतो, हातपाय लटपटतात आणि डोळ्यासमोर साऱ्या आठवणी पुन्हा समोर येतात, मात्र दैवी चमत्कार व्हावा तसं अगदी क्षणात सारं काही बदलतं आणि ज्या क्षणी सारं संपणार असं वाटतं तिथेच जीव वाचण्यासाठी एक आशेचा किरण दिसतो. अगदी तसंच काहीसं या महिलांसोबत घडलं आहे. एक दोन नाही तर तब्बल 22 महिलांसोबत हे घडलं आहे.
चंद्रपूरहून योगा ग्रूपच्या 22 महिलांनी एकत्र पर्यटनाला जायचा प्लॅन केला. दोन दिवसांची ट्रिप सुंदर झाली पण परतीचा क्षण आला तेव्हा या महिलांसोबत धक्कादायक घटना घडली. चिखलदारहून निघाल्यानंतर अर्ध्याच तासात मडकी गावाजवळ गाडी थांबवावी लागली. एका महिलेला उलटी आल्यामुळे ही गाडी थांबवली, त्या महिलेला सावरण्यासाठी काही महिला खाली उतरल्या त्यांच्यासोबत चालकही गाडीतून खाली उतरला. त्यानंतर तो पुन्हा पाण्याची बाटली आणून देण्यासाठी गाडीकडे गेला. तेव्हा लक्षात आलं की गाडी हळूहळू पुढे सरकत आहे.
advertisement
प्रत्यक्षदर्शी महिलांना सांगितलेल्या माहितीनुसार गाडी हळूहळू पुढे सरकत होती. चालकानं वाहन रोखण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. वाहन दरीच्या दिशेनं निघालं. बसमध्ये बसलेल्या काही महिलांचा गोंधळ सुरू झाला. चालकाने वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या प्रयत्नात चालकाला आपला जीव गमवावा लागला. हा सगळा थरार महिलांनी डोळ्यासमोर पाहिला.
advertisement
दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, वाहन दरीच्या दिशेनं गेलं खरं मात्र ते पुढे जाऊन झाडाला धडकलं. जर ते झाडाला धडकलं नसतं तर मात्र मोठा अनर्थ घडला असता. वाहन झाडाला धडकल्यानंतर महिला गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. ते झाड नसतं तर गाडी थांबलीच नसती. वाहनातील महिला सुखरुप आहेत. झाड आमच्यासाठी देवदूत ठरलं अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी महिलांनी दिली आहे. चालकाचा मृत्यू झाल्याचं भावना टेकाम यांनी सांगितलं. चंद्रपूरहून चिखलदरा इथे गेलेली 26 सीटर ट्रॅव्हल्स सोबत हे भयंकर घडलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
advertisement
उतार आणि वाहनाचं वजन यामुळे गाडी पुढे सरकत गेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. चिखलदार ते परतवाडा मार्गावर आडनदीलगत वळणावर ही धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात रविवार दुपारच्या सुमारास झाला. 22 महिला आणि एक मुलगी अशा 23 जण सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अचानक बस दरीत जाऊ लागली अन्...' चालकाचा मृत्यू पण 22 महिलांचा जीव एका झाडानं कसा वाचला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement