Chandrapur News : राज्यात नेमकं चाललंय काय? 25 वर्षीय मनोरुग्ण तरुणीला बनवलं सावज; बदलापूरनंतर चंद्रपूर हादरलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Chandrapur News : राज्यात महिला अत्याचाराचा प्रश्न तापलेला असताना चंद्रपुरातही अशीच एक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर, (हैदर शेख, प्रतिनिधी) : राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटना वाचून कोणाचेही मन सुन्न होईल. बदलापूर घटनेनंतर तर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. ह्या घटना ताज्या असतानाच आता चंद्रपूरमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.
मनोरूग्ण तरुणीवर अत्याचार
नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला. 12 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा आरोपीच्या सहकाऱ्यांनी व्हिडीओ काढला. हा व्हिडिओ आज समाजमाध्यमावर व्हायरल झाला. सकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागभीड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली. सोबतच आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करत दबाव वाढविला. पोलिसांनी व्हिडीओची तपासणी करून विविध पथके गठीत करत मुलीचा मग काढला. सोबतच घटनेत सामील सर्व 5 आरोपींना 3 तासात ताब्यात घेतले. राज्यभर महिला विरोधातील गुन्ह्याच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागभीड येथे दाखल झाले. या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. सोबतच हा कथित व्हिडीओ कुणालाही पाठवू नका, कारवाई ओढवून घेऊ नका अशी ताकीद दिली आहे.
advertisement
महाराष्ट्र बंदला परवानवी नाकारली
बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काही लोकांनी बंदविरोधात मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली असून हा बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे.
advertisement
बंद बेकायदेशीर
उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोर्टाचे लेखी आदेश जारी होतील.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
August 23, 2024 7:40 PM IST
मराठी बातम्या/चंद्रपूर/
Chandrapur News : राज्यात नेमकं चाललंय काय? 25 वर्षीय मनोरुग्ण तरुणीला बनवलं सावज; बदलापूरनंतर चंद्रपूर हादरलं