Chandrapur : अल्पवयीन मुलीला खर्रा खायचं व्यसन, उधारी वसुलीसाठी लैंगिक शोषण; गर्भवती झाल्यानं...

Last Updated:

Chandrapur Crime News : उधारी न फेडू न शकल्याने आरोपी अल्पवयीन मुलीचे गेल्या ४ महिन्यांपासून लैंगिक शोषण करत होता.

(AI Image)
(AI Image)
हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूरात खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित मुलगी गर्भवती झाल्याने ही घटना उघडकीस आली. दुर्गापूर पोलिसांनी आरोपी बबन रोहणकर (५२) ला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी बबन रोहणकर याची दुर्गापूर भागात पानटपरी आहे. त्याच्या टपरीवर पीडित १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करायची. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजारांवर पोचली. मात्र उधारी न फेडू न शकल्याने आरोपी अल्पवयीन मुलीचे गेल्या ४ महिन्यांपासून लैंगिक शोषण करत होता. याच शारीरिक शोषणातून मुलगी गर्भवती झाली. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
advertisement
मुलीला खर्रा खाण्याचं व्यसन कधी लागलं याची माहिती मिळाली नाही. पण तिला खर्रा खाल्ल्याशिवाय चैन पडत नव्हता. सुरुवातीला ती पैसे देऊन खर्रा विकत घेत होती. पण व्यसन वाढल्यानंतर तिला पैसे देणं अवघड झालं. ती उधारीने खर्रा घेऊ लागली. तिला आरोपी बबनने सुरुवातीला उधार खर्रा दिला.
उधारी वाढायला लागल्यानं आरोपी बबन भडकला. त्यानं पीडितेला पैशांची विचारणा केली. ती टाळायला लागताच आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. उधारीच्या बदल्यात तो सतत तिच्यावर अत्याचार करू लागला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती झाली. मासिक पाळी चुकल्यानंतर तिला रुग्णालयात नेताच हा प्रकार उघडकीस आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Chandrapur : अल्पवयीन मुलीला खर्रा खायचं व्यसन, उधारी वसुलीसाठी लैंगिक शोषण; गर्भवती झाल्यानं...
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement