Maharashtra politics : मोठी बातमी! राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच मनसैनिक भिडले, नुसती हाणामारी, Video
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर दोन गटात हा राडा झाला आहे.
चंद्रपूर, प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे, निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगणार आहे, मात्र दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे, या निवडणुकीमध्ये मनसेकडून जवळपास 250 जागांवर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेची देखील मोठी भूमिका असणार आहे. मनसेकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेसाठी उमेदवाराच्या नवाची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेसाठी 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
advertisement
राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मनसेच्या दोन गटात जोरदार राडा झाला आहे, त्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. pic.twitter.com/fFODgsMdPO
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2024
दरम्यान, राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच चंद्रपूरमध्ये मनसैनिक भिडल्याचं पाहायला मिळालं. दोन गटात हाणामारी झाली आहे. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे.
Location :
Chandrapur,Chandrapur,Maharashtra
First Published :
August 23, 2024 8:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Maharashtra politics : मोठी बातमी! राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच मनसैनिक भिडले, नुसती हाणामारी, Video