MBBS तरुणीची आत्महत्या; पहिला प्रयत्न फसल्यानंतर गेली खोल पाण्यात, लोक काढत बसले VIDEO

Last Updated:

एमबीबीएस तरुणीचा आत्महत्येचा पहिला प्रयत्न फसला. मात्र त्यानंतर तरुणीने जास्त खोल पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली.

News18
News18
हैदर शेख, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एमबीबीएस तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ईशा बिंजवे (२४) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या ईशाने संध्याकाळच्या दरम्यान चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली. मात्र नदीत ज्या ठिकाणी उडी घेतली त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने तिचा पहिला प्रयत्न फसला. मात्र या तरुणीने जास्त खोल पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. पिंपळगाव जवळच्या नदी पात्रात मृतदेह आढळून आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
ईशाचे आई-वडील दोन्ही होमियोपॅथी डॉक्टर असून ब्रम्हपुरी शहरात त्यांचा दवाखाना आहे. पुलावरून जाणाऱ्या अनेक लोकांनी ही घटना मोबाईल मध्ये शूट केली. याचे व्हिडीओ वायरल झाले आहेत. ईशा एमबीबीएस असून तिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वैनगंगा नदीन आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. पहिल्यांदा उडी मारली तेव्हा पाणी कमी असल्याने ती वाचली. मात्र, त्यानंतर पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेत जीवन संपवलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
ईशा स्कुटीने वैनगंगा नदीच्या वडसा इथं असलेल्या पुलावर आली होती. त्यानंतर दुचाकी उभी करून चपला काढल्या आणि नदीत उडी मारली. पात्रात पाणी कमी असल्यानं ती वाचली. पण नंतर ती जास्त पाणी असलेल्या ठिकाणी गेली. तिचा यावेळी व्हिडीओही अनेकांनी काढला. मात्र वाचवण्यासाठी कुणीही गेलं नाही. वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रात तिचा मृतदेह आढळून आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
MBBS तरुणीची आत्महत्या; पहिला प्रयत्न फसल्यानंतर गेली खोल पाण्यात, लोक काढत बसले VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement