Chandrapur Tadoba : 'मित्र वनव्यामध्ये..' दोस्ताला वाघाच्या जबड्यात पाहून थेट काळाशी भिडला; Video Viral
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Chandrapur Tadoba : आपल्या जोडीदाराला वाघाच्या जबड्यात पाहून मित्राने थेट हल्ला चढवला.
चंद्रपूर, (हैदर शेख, प्रतिनिधी) : आपल्याकडे मैत्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. पृथ्वीच्या पाठीवर असा एकही मनुष्यप्राणी नसेल की ज्याला मित्र नाही. कदाचित त्यामुळेच आपल्याकडे मैत्रीची गाथा सांगणारं अमाप साहित्य निर्माण झालं आहे. मैत्रीसाठी स्वतःचा जीव पणाला लावणारी असंख्य माणसं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. अशाच मैत्रीचा एक अनोखा व्हिडीओ चंद्रपुरातून समोर आला आहे. मात्र, हा व्हिडीओ कोण्या मनुष्यप्राण्याचा नसून वन्यप्राण्याचा आहे. आपल्या दोस्ताला मृत्यूच्या जबड्यात पाहून तो थेट काळालाच भिडल्याचे पाहायला मिळतंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वाघाने काढला पळ
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी काल (शनिवारी) आपल्या कॅमेऱ्यात हा थरारक प्रसंग कैद केला. मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर लपून हल्ला केला. रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा निकराने प्रयत्न करत होता. मात्र, वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने धरली होती. मात्र, अचानक रानगव्याच्या कळपातील अल्फा नराने आपल्या जोडीदाराला संकटात पाहून वाघावर प्रतिहल्ला चढविला. अल्फा नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोट्या दडीयलने शिकार सोडून पळ काढला. यामुळे अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
advertisement
अशी दोस्ती तुम्ही पाहिली नसेल, मित्रासाठी थेट वाघाला भिडला#chandrapur #tadoba pic.twitter.com/tUdrfHLUt4
— News18Lokmat (@News18lokmat) February 18, 2024
शेततळ्यात आढळली महाकाय मगर?
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहरातील संजय हलगरकर यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये मगर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सेजाळ यांनी घटनास्थळी जाऊन मगर असल्याची खात्री केली आणि वनविभागाला कळविले. वनविभागाचे वनरक्षक बडगीरे यानी तालुक्यातील राठोडा लांबोटा येथील सर्पमित्र, प्राणीमित्रांना तात्काळ बोलावून घेऊन हलगरकर यांच्या शेतात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी जवळपास तीन तास जिकरीचे प्रयत्न करावे लागले. सदरील शेततळ्याच्या बाजूला लागूनच वस्ती असल्यामुळे नागरीकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच अचानक मगर आल्याने काही काळ शहरात भितीचे वातावरण पसरले होते. गावातील काही नागरिकांनी तर आपली घराची दारे बंद करून घेतले होते. त्यानंतर दोनशे किलो वजन आणि आठ फुट लांब असलेल्या या महाकाय मगरीला 14 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तरूणांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करून वनविभाने घेऊन गेल्यानंतर शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
February 18, 2024 5:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Chandrapur Tadoba : 'मित्र वनव्यामध्ये..' दोस्ताला वाघाच्या जबड्यात पाहून थेट काळाशी भिडला; Video Viral