'सर्वांचे फोन, WhatsApp सर्व्हेइलन्सवर टाकलेत', निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Last Updated:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्याने खळबळजनक विधान केलं आहे. सर्वांचे मोबाईल फोन आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेइलन्सवर टाकले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

News18
News18
भंडारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपल्या आहे. आगामी निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कुठे युती-आघाडी तर कुठे स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. अशात आपला पक्ष फुटणार नाही, पक्षाला खिंडार पडणार नाही, यासाठी विशेष काळजी देखील पक्षाकडून घेतली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्याने खळबळजनक विधान केलं आहे. सर्वांचे मोबाईल फोन आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेइलन्सवर टाकले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हे वक्तव्य भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बावनकुळे यांनी नुकताच भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भंडारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका कशा जिंकायच्या? यासाठी रणनीतीचा आढावा घेतला. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी त्यांनी पक्षातील अंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेइलन्सवर असल्याचं वक्तव्य केलं.
advertisement

बावनकुळे नक्की काय म्हणाले?

भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशाराही त्यांनी दिला. तर भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्यही बावनकुळे यांनी केलं.
advertisement
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो. एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळं चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे."
advertisement

..तर नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद

पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होतील असा इशारा बावनकुळे यांनी दिला. भंडारा भाजपच्या वतीने दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, "नेत्यांनी विचार करावा. आवेशात, तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण खडा तमाशा करतो. एक चुकीची बटन, एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या योजनांचा यामुळे बट्ट्याबोळ होईल. आपल्या पक्षात एक जरी कार्यकर्त्यांनं बंडखोरी केली तरी, पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होईल, हे सर्वांनी लक्षात ठेवावं."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सर्वांचे फोन, WhatsApp सर्व्हेइलन्सवर टाकलेत', निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement