एकीकडे शिंदेंची कोंडी, आता अजितदादांना दणका; पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई NCP चा चेहराच डॅमेज!

Last Updated:

ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आरोप निश्चित झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

Ajit Pawar Nawab Malik-
Ajit Pawar Nawab Malik-
मुंबई  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील आर्थिक मालमत्तांशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी आरोप असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एमपी एमएलए कोर्टाने दणका दिला आहे. नवाब मालिकांविरोधात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झाले आहे. ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आरोप निश्चित झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे
मलिक यांनी डी कंपनीच्या सदस्यांसह हसीना पारकर, सलीम पटेल आणि आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत. भाजपने मलिक यांच्याविरोधात आरोप केले होते. यानंतर ईडीने मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. नवाब मलिक यांच्यावर पीएमएलए कायद्याच्या कलम 3,4 आणि 17 अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आङे. तर आरोप मान्य नसल्याचं मलिकांनी कोर्टात वक्तव्य केले आहे. दरम्यान, दाऊद इब्राहिम संबधित या मनी लाँड्रिंग असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. जर पुरवणी आरोपपत्र दाखल झालं तर दाऊद किंवा दाऊद संबंधित आरोपींची संख्या वाढू शकत असल्याचे संकेत आहे.
advertisement

डिसेंबर 19 ला होणार पुढील सुनावणी

या प्रकरणी नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक सध्या झाली होती. सध्या नवाब मलिक जामिनावर बाहेर आहेत. दाऊद इंडहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डिसेंबर 19 ला होणार पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर दैनंदिन सुनवणीला सुरुवात होणार आहे.
advertisement

नवाब मलिक मुंबई राष्ट्रवादीचा चेहरा

एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वी  नवाब मलिक हे मुंबईचा चेहरा होते. मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबादारी देखील त्यांच्यावर होती.  मात्र आता ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी  आता आरोप निश्चिती झाल्याने एक प्रकारे डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काय आहे प्रकरण?

गोवावाला कंपाउंडमधील जमीन खरेदीत व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतरच ईडीने त्यांना अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारातून दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. नवाब मलिक गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लबंर या महिलेची तीन एकर जागा कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप होता. यामध्ये नवाब मलिक यांच्यासोबत हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांचीही नावे आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकीकडे शिंदेंची कोंडी, आता अजितदादांना दणका; पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई NCP चा चेहराच डॅमेज!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement