नियतीचा अजब खेळ! 2 सख्ख्या बहिणी, दोघींनाही मृत्यूनं एकत्र गाठलं

Last Updated:

दोघी बहिणी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी तीन वाजता गावातील एका तरुणाने या बकऱ्या त्यांच्या घरी आणून सोडल्या.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
अविनाश कानडजे, प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर : मृत्यू कधी कसा कुठे कुणाला गाठेल सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ ठरलेली असते असं म्हणतात. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या बहिणी ज्यांना मृत्यूने एकत्र गाठलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणींनी एकत्र जीव गमावला आहे. त्यामुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ही घटना. प्राची चव्हाण आणि मलिका चव्हाण या सख्ख्या बहिणी. दोघीही पान रांजणगाव आणि मारोळा शिवारात या दोघीजणी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी तीन वाजता गावातील एका तरुणाने या बकऱ्या त्यांच्या घरी आणून सोडल्या. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला आपल्या मुलींबाबत विचारलं. तर त्याने बकऱ्या मोकाट चरत होत्या, त्यांच्यासोबत कुणीच नव्हतं म्हणून मी घरी आणून सोडलं असं सांगितलं.
advertisement
त्यानंतर आई-वडिलांनी मुलींचा शोध सुरू केला. शिवारातील एका पाण्याच्या डबक्यात त्या बुडालेल्या आढळून आल्या. दरम्यान या घटनेप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 4 सख्ख्या बहीण-भावंडांचा बुडून मृत्यू
आठवडाभरापूर्वी अशीच घटना जळगावातही घडली होती. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान घडली.
advertisement
पिंपरखेड गावात आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आले होते. त्यांच्या परिवारात 5 मुली, 1 मुलगा. परिवारातील मोठी मुलगी भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती. बहिणीसोबत जावं म्हणून रोशनी सुभाषसिंग आर्य (वय 9 वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय 8 वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय 3 वर्ष) आराध्या सुभाषसिंग आर्य (वय 4 वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) ही चार मुलं रविवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सोबत गेली.
advertisement
धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. काहींनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवलं. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नियतीचा अजब खेळ! 2 सख्ख्या बहिणी, दोघींनाही मृत्यूनं एकत्र गाठलं
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement