advertisement

बुलढाणा : रात्री बंद केलेलं दुकानाचं शटर अचानक उघडलं; CCTV पाहून हादरला मालक

Last Updated:

एक ज्वेलर्सचे दुकान ज्याचं शटर त्याच्या मालकाने रात्री नीट बंद केलं होतं. पण नंतर हे शटर उघडं दिसलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. Cctv तपासले असता. त्यात जे दिसलं ते धक्कादायक होतं.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी/बुलढाणा : जिल्ह्याच्या मेहकर शहरातील एक ज्वेलर्सचे दुकान ज्याचं शटर त्याच्या मालकाने रात्री नीट बंद केलं होतं. पण नंतर हे शटर उघडं दिसलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. Cctv तपासले असता. त्यात जे दिसलं ते धक्कादायक होतं. दृश्य पाहून सराफा दुकानाच्या मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.
सराफा व्यावसायिक कैलास धानुका यांचे मथुरा ज्वेलर्स. रात्री दुकान मालक कैलास हे दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळीच ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला की दुकानाचं शटर उघडं आहे कैलास यांनी दुकानात जाऊन पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला.
13 लाखांचे दागिने गायब 
चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात चोरी केली असल्याचे समोर आलं.  दुकानातून चोरट्यांनी 13 लाखांचे दागिने लंपास केले. चोरट्यांची ही चोरी दुकानातील cctv मधे कैद झाली.
advertisement
इथं पाहा व्हिडिओ 
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तोंडाला रुमाल बांधलेला हा तरुण दुकानाच्या सर्व कपाटातील ऐवज लुटताना दिसतो आहे. शेवटी तो टेबलवर चढतो आणि cctv कॅमेरा ओढून काढताना दिसतो. पण तोपर्यंत त्याने केलेलं संपूर्ण कृत्य या कॅमेर्‍यात कैद झालं. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
चोराचा शोध सुरू
त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. cctv च्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. मात्र या घटनेमुळे सराफा व्यावसायिकमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलढाणा : रात्री बंद केलेलं दुकानाचं शटर अचानक उघडलं; CCTV पाहून हादरला मालक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement