दिवाळीआधी मोठी कारवाई, छ. संभाजीनगरात भेसळ कांड, तब्बल 180 किलो खवा अन् मिठाई जप्त
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात दिवाळीआधीच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 180 किलो खवा आणि मिठाई जप्त करण्यात आलीये.
छत्रपती संभाजीनगर – दिवाळीचा सण जवळ आला असताना मिठाई आणि खव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा काळात काही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होण्याचा धोका वाढतो. अशाच एका प्रकरणाचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगरमधील वेदांतनगर पोलिसांनी केला असून सुमारे 5 लाख रुपये किमतीचा भेसळयुक्त खवा आणि मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे.
वेदांतनगर पोलिसांनी पंचवटी चौकातील ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये केलेल्या कारवाईत 180 किलो वजनाचे सहा पोते सापडले, ज्यात खवा व मिठाई साठवण्यात आलेली होती. हा साठा गुजरातमधील अहमदाबाद येथून आणला गेला होता आणि तो चाळीसगाव, धुळे व सिल्लोड येथे विक्रीसाठी पाठवण्यात येणार होता. ही माहिती मिळताच अन्न व औषध सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी साठ्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
advertisement
अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खवा किंवा मिठाईमध्ये भेसळीचा संशय आल्यास foscos.fssai.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स चालकाने खवा 150 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला होता आणि तो 300 रुपये प्रति किलो दराने विकण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी संबंधित चालक, विक्रेते, मालक व खरेदीदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
बनावट खवा ओळखण्याचा
चविला पिठासारखा लागतो.
पोत सामान्य खव्याप्रमाणे मऊ नसतो.
रंग थोडासा हिरवटसर दिसतो.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवाळीआधी मोठी कारवाई, छ. संभाजीनगरात भेसळ कांड, तब्बल 180 किलो खवा अन् मिठाई जप्त