Shocking : काळीज सुन्न करणारी घटना! अपघातात मामा-भाचीनंतर गर्भातील बाळाचाही मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : मोंढा नाका पुलावर झालेल्या भीषण अपघाताने तीन निष्पाप जीव हिरावले. मामा आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळानेही श्वास सोडला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त केले. या अपघातात मामा आणि पाच वर्षांच्या चिमुकल्या भाचीचा मृत्यू झाल्यानंतर आता सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंगोली येथील रहिवासी अब्दुल अबित मुजीब हा एमजीएममध्ये बीटेकचे शिक्षण घेत असून शनिवारी रात्री तो आपल्या नातेवाइकांसह जयभवानीनगर येथे जेवणासाठी गेला होता. जेवण आटोपून सर्वजण सिटर रिक्षाने घरी परतत असताना मध्यरात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास मोंढा नाका पुलावर भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की अख्तर रज्जा रिक्षातून फेकले जाऊन थेट पुलाखाली कोसळले, तर पाच वर्षांची जोहरा जागीच मृत्युमुखी पडली.
advertisement
या अपघातात गंभीर जखमी झालेली अलिझा ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आई सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जन्म घेण्याआधीच बाळाचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
अपघातानंतर कारचालक कश्यप पटेल घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र जवाहरनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा नातेवाइकांचे गॅदरिंग संपवून लाँग ड्राइव्हसाठी निघाल्याचे समोर आले आहे. शहरात परतताना मोंढा नाका पुलावर त्याने कारचा वेग प्रचंड वाढवला आणि घाईघाईत निष्पाप प्रवाशांच्या रिक्षाला धडक दिली.
advertisement
एका क्षणाच्या बेदरकारपणामुळे हसत-खेळत घरी परतणारे कुटुंब कायमचे उद्ध्वस्त झाले. मामा-भाचीसह गर्भातील बाळाचा जीव गेल्याने या अपघाताने केवळ तीन जीव नाही, तर अनेक स्वप्नेही हिरावून घेतली आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shocking : काळीज सुन्न करणारी घटना! अपघातात मामा-भाचीनंतर गर्भातील बाळाचाही मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर










