दिवाळीची खरेदी केली अन् घरी परतताना नको ते घडलं, पतीनं जग सोडलं, पत्नी...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: दिवाळीची खरेदी करून घराकडे निघालेल्या दुचाकीला ट्रॅक्टरने उडवले. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident: दिवाळीची खरेदी केली अन् घरी परतताना नको ते घडलं, पतीनं जग सोडलं, पत्नी...
Chhatrapati Sambhajinagar Accident: दिवाळीची खरेदी केली अन् घरी परतताना नको ते घडलं, पतीनं जग सोडलं, पत्नी...
‎छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या आनंदाला हादरा देणारी दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यात घडली आहे. पत्नीसह दिवाळीची खरेदी करून घरी परतणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर तोच ट्रॅक्टर पुढे जाऊन आणखी एका दुचाकीला धडकला, यातही दोघे गंभीर जखमी झाले.
‎ही भीषण दुर्घटना धामोरी फाटा व समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ घडली. विठ्ठलसिंग नरसिंग जारवाल (वय 42, रा. वरझडी, ता. गंगापूर) असे मृताचे नाव असून, त्यांची पत्नी रंजना जारवाल या गंभीर जखमी आहेत.
‎मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलसिंग जारवाल हे पत्नीसमवेत दिवाळीच्या खरेदीसाठी लासुर स्टेशन येथे गेले होते. खरेदी आटोपून दोघे दुचाकीने परतत असताना धामोरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विठ्ठलसिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी रंजना गंभीर जखमी झाल्या.
advertisement
‎दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर तोच ट्रॅक्टर चालक पुढे गेला आणि समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ आणखी एका दुचाकीला धडक देत दोन जणांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
advertisement
‎उपचारादरम्यान विठ्ठलसिंग जारवाल यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
‎दिवाळीच्या उंबरठ्यावरच कर्ता पुरुष गमावल्याने जारवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत ट्रॅक्टर चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवाळीची खरेदी केली अन् घरी परतताना नको ते घडलं, पतीनं जग सोडलं, पत्नी...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement