दिवाळीत ऑनलाइन फसवणूक, पोलिस थेट उतरले बाजारात, नागरिकांमध्ये दिला जनजागृतीचा संदेश, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
दिवाळी म्हटले की आपल्याकडे सर्वजण खरेदी करतात. सध्या बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात सध्या दिवाळीची लगबग सुरू आहे. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी म्हटले की आपल्याकडे सर्वजण खरेदी करतात. सध्या बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे. पण आपल्यापैकी काही जण ऑनलाईन शॉपिंग देखील करतात आणि या ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकांची फसवणूक होते, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
दिवाळीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताना आपली फसवणूक होऊ नये, याकरता छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस थेट बाजारपेठेत उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये जाऊन जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये शहरातील पोलिसांनी हातामध्ये पॉम्पलेट त्यासोबत पोस्टर घेऊन खरेदी करता आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केलेलं आहे.
advertisement
या पॉम्पलेटच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सांगितलं आहे की, तुमची कशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक होऊ शकते आणि यावर तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याचं मार्गदर्शन पोलिसांनी नागरिकांना केलेलं आहे. यावेळी पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करा पण सावध राहा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, ओटीपी कुणालाही सांगू नका, असे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पोलीस सध्या करत आहेत.
advertisement
यावेळी नागरिकांनी देखील पोलिसांना सांगितले की, आम्ही देखील योग्य ती काळजी घेऊन ऑनलाईन खरेदी करू. त्यासोबत जे विश्वासू ॲप आहेत, त्यावरूनच आम्ही खरेदी करू असं नागरिक म्हणाले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन खरेदी करत असाल तर योग्य ती काळजी घेऊन ऑनलाईन खरेदी करा. त्यासोबत जे विश्वासू वेबसाईट आहेत किंवा ॲप आहेत, त्यावरूनच तुम्ही खरेदी करा. कुठल्याही अनोळखी ॲपवरून खरेदी करू नका, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही, असा संदेश पोलिसांनी दिलेला आहे.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:18 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
दिवाळीत ऑनलाइन फसवणूक, पोलिस थेट उतरले बाजारात, नागरिकांमध्ये दिला जनजागृतीचा संदेश, Video