Chhatrapati Sambhajinagar: ‘वंदे मातरम’ गायनासाठी वाहतुकीत मोठे बदलं, शुक्रवारी हा रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘वंदे मातरम’ गायनासाठी महत्त्वाचा रस्ता बंद राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला यंदा 150 वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांती चौक येथील हुतात्मा स्मारकावर सकाळी सार्वजनिक वंदे मातरम गायन, देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांच्या सहभागाने विशेष सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले असून, सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत क्रांती चौक ते गोपाल टी आणि परतीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. ही माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील कराळे यांनी दिली.
advertisement
पर्यायी वाहतूक मार्ग
क्रांती चौकाकडून गोपाल टीकडे जाणारी वाहतूक चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे वळवली जाईल.
गोपाल टीकडून क्रांती चौकाकडे येणारी वाहतूक संत एकनाथ रंगमंदिर आणि उत्सव चौकमार्गे नेली जाईल.
अमरप्रीत हॉटेलकडून गोपाल टीकडे जाणाऱ्यांसाठी रमानगर किंवा चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध राहील.
सेशन कोर्टकडून गोपाल टीकडे जाणारी वाहतूक क्रांती चौक उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेऊन चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे वळवली जाईल.
advertisement
सिल्लेखाना चौककडून येणारी वाहतूक सेशन कोर्ट किंवा चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे वळवली जाईल.
वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून वंदे मातरमच्या या कार्यक्रमाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 06, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: ‘वंदे मातरम’ गायनासाठी वाहतुकीत मोठे बदलं, शुक्रवारी हा रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?


