Water Crisis: छ. संभाजीनगरमध्ये जलसंकट, दिवाळीपूर्वीच 10 दिवसांआड पाणी, ‘जल बेल’ही फेल!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 10 दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत असतानाच, आता एमजेपीच्या शटडाऊनमुळे नागरिकांना पुन्हा एकदा 8 ते 10 दिवसांनी पाणी मिळणार आहे. मनपाच्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या जोडणीसाठी सहा दिवसांचा शटडाऊन देण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम शहरातील नियमित पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
पाणी मिळण्याचे टप्पे सरकत असून, आधी सात-आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता दहा दिवसांनंतर मिळत आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल वाढले आहेत.
'जल बेल' अपयशी, माहितीचा अभाव
छत्रपती संभाजीनगर मनपाकडून उपलब्ध करून दिलेले 'जल बेल' अॅपदेखील नागरिकांच्या उपयोगाचे ठरत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अॅपवर अद्ययावत माहिती नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
advertisement
या भागांमध्ये पुरवठा विस्कळीत
गारखेडा, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा, सिडको, हडको आणि जुन्या शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. जुनी पाणीपुरवठा यंत्रणा आणि सातत्याने येणाऱ्या अडचणींमुळे मनपाचे नियोजन अडथळ्यांत सापडले आहे.
दरम्यान, या वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईविरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने यावर स्थायी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 07, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Water Crisis: छ. संभाजीनगरमध्ये जलसंकट, दिवाळीपूर्वीच 10 दिवसांआड पाणी, ‘जल बेल’ही फेल!