तूर-कपाशीच्या शेतात ‘गुपित’ पिकलं… पोलिस आले आणि थक्क झाले!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील तूर आणि कपाशीच्या पिकात वेगळीच झाडे लावली. आता पोलीस चौकशी सुरू असून थेट कारवाई करण्यात आलीये.
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात एका साध्या शेतकऱ्याच्या शेतात काहीतरी असं उगवत होतं की पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली! दिसायला अगदी नेहमीसारखं तूर आणि कपाशीचं शेत... पण त्या पिकांच्या मध्ये काही झाडं अशी होती की संपूर्ण गावात कुजबुज सुरू झाली, “अहो, त्या शेतात तूर नव्हे तर दुसरंच काहीतरी उगवलंय म्हणे!”
पळसखेडा शिवारातील गट क्रमांक 17. सकाळचा वेळ. सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे आणि त्यांचं पथक शेताच्या दिशेनं निघालं होतं. माहिती खरी आहे का हे बघायला ते गेले, पण शेतात पाऊल टाकताच सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तुरीच्या ओळींमधून उंच उंच हिरव्या झाडांचा घोस दिसत होता. “हे तूर नाही… हा तर गांजा आहे!” असं कोणी तरी पुटपुटलं आणि क्षणात सगळं पथक सतर्क झालं.
advertisement
एकामागून एक झाडं मोजली गेली. एकूण 16 झाडं, पाच ते सहा फूट उंच. वजन केलं तर 19 किलो. आणि किंमत? तब्बल 95 हजार रुपये! गावकरी दूरून बघत होते. कुणी म्हणालं, “आपल्याच गावात असं काही चालू आहे हे कोणाला ठाऊक होतं?”
advertisement
पोलिसांनी लगेचच शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. नाव आयसखा शेकलाल तडवी वय 69, रा. गोद्री, जि. जळगाव. एवढ्या वयात असं धाडस कोणी करेल, हे ऐकून लोकच थक्क झाले.
गावात मग एकच चर्चा सुरू झाली. “तूर-कपाशीच्या शेतात गांजा लावायचा? एवढं सगळं लपवता येतं का?” कोणी म्हणालं, “शेतकऱ्याने मजा करायची म्हटली दिसते!” तर दुसरा म्हणाला, “आता पोलीसच दाखवतील काय मजा असते ते!”
advertisement
एनडीपीएस कायद्यानुसार तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील करत आहेत.
सोयगाव तालुक्यात हा विषय आता गावोगाव चर्चेचा ठरला आहे. “तूरमध्ये काय उगवतंय बघा, कपाशीच्या सावलीत काय लपलंय बघा!” लोक हसत बोलतात, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, “हे सगळं झाल्यावर शेतकऱ्याच्या मनात नेमकं काय आलं असेल?”
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 15, 2025 11:22 AM IST