छ. संभाजीनगरकरांना रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मुंबई, नांदेडसह या ठिकाणी धावणार विशेष ट्रेन, वेळापत्रक

Last Updated:

Diwali Special Train: छत्रपती संभाजीनगरकरांसाठी रेल्वेनं दिवाळीनिमित्त खास गिफ्ट दिलंय. मुंबई, नांदेडसाठी विशेष रेल्वे धावणार आहे.

छ. संभाजीनगरकरांना रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मुंबई, नांदेडसह या ठिकाणी धावणार विशेष ट्रेन, वेळापत्रक
छ. संभाजीनगरकरांना रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मुंबई, नांदेडसह या ठिकाणी धावणार विशेष ट्रेन, वेळापत्रक
‎छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खास भेट दिलीय. आता मुंबई, नांदेड आणि करीमनगर या दिशांना जाणाऱ्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
‎नांदेडहून सुटणारी गाडी (क्रमांक 07614) 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.50 वाजता सुटून 18 ऑक्टोबरला सकाळी 7.20 वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचेल. तर मुंबईहून करीमनगरकडे जाणारी वातानुकूलित विशेष गाडी (क्रमांक 01021) 18 ऑक्टोबर रोजी रात्री 12.20 वाजता सुटणार असून, संभाजीनगर स्थानकावरही तिचा थांबा असेल.
advertisement
‎हिच गाडी परतीसाठी 18 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजता करीमनगरहून सुटून 19 ऑक्टोबरला पहाटे 4.30 वाजता संभाजीनगरला येईल आणि पुढे मुंबईकडे रवाना होईल.
‎सणासुदीच्या काळात ही विशेष सोय म्हणजे प्रवाशांसाठी दिलासा आणि रेल्वे प्रशासनाकडून ‘ट्रॅव्हलचा बोनस गिफ्ट’च म्हणावा लागेल.
‎थांबे (दोन्ही दिशांना)
‎दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरटल आणि करीमनगर.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरकरांना रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मुंबई, नांदेडसह या ठिकाणी धावणार विशेष ट्रेन, वेळापत्रक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement