माझ्या नवऱ्याला 'इन्स्टा'वर फॉलो का केलं?; शेजारणींच्या दोन गटांत रस्त्यावर तुंबळ हाणामारी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सोशल मीडियावर नवऱ्याला फॉलो केल्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. हे प्रकरण थेट पोलिसांत गेलंय.
छत्रपती संभाजीनगर : आजच्या काळात सोशल मीडियाने नातेसंबंधांमध्ये जवळीक आणली, पण कधी कधी तीच जवळीक दुराव्याचं कारण बनते. 'लाईक' आणि 'फॉलो'च्या दुनियेत भावना इतक्या गुंततात की वास्तव आणि आभासी जग यामधली रेषाच पुसली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच एका सोशल मीडिया वादाने थेट रस्त्यावर हाणामारीचा रंग घेतला. कारण एवढंच, "माझ्या नवऱ्याला तू इन्स्टाग्रामवर फॉलो का केलंस?" हा हाय-व्होल्टेज ड्रामा बुधवारी 8 ऑक्टोबरच्या रात्री आंबेडकरनगरच्या गल्लीमध्ये झाला.
सिडको पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, शेजारच्या महिलेने आपल्या पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याच्या संशयावरून ही लढाई पेटली. आंबेडकरनगरच्या गल्ली क्रमांक 9 मध्ये 8 ऑक्टोबर 2025 च्या रात्री एका इन्स्टाग्राम फॉलोच्या वादाने चक्क रस्त्यावर हाणामारीचा तमाशा रंगला! शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमधला हा वाद इतका भडकला की, गल्लीत अर्धा तास धडाम-धडाम सुरू होतं. सिडको पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, हा सगळा प्रकार एका साध्या संशयावरून उफाळला – "तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर का फॉलो केलंस?"
advertisement
31 वर्षीय फिर्यादी महिला घरासमोर उभी असताना शेजारची महिला तिच्यावर तुटून पडली. "माझ्या नवऱ्याला तू फॉलो का केलंस?" असा थेट सवाल तिने केला. फिर्यादीने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, "अगं, मी काही फॉलो केलं नाही, उलट तुझ्या नवऱ्यानेच मला फॉलो केलंय!" पण समोरची बाई ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हती. मग काय, शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली आणि काही वेळातच ती थेट मारामारीत बदलली. मुख्य आरोपी महिलेसोबत तिची नणंद आणि आणखी एक मैत्रीणही होती. या तिघींनी फिर्यादीला शिव्या दिल्या आणि नणंदेने तर चक्क दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर हाणला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाली.
advertisement
या राड्यामुळे गल्लीत एकच गर्दी जमली. फिर्यादीचा भाऊ तिथे पोहोचला आणि त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सिडको पोलिसांनी तक्रार दाखल करून मुख्य आरोपीसह त्या दोन महिलांवर गुन्हा नोंदवला आहे. हवालदार विद्या राठोड आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 11, 2025 10:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
माझ्या नवऱ्याला 'इन्स्टा'वर फॉलो का केलं?; शेजारणींच्या दोन गटांत रस्त्यावर तुंबळ हाणामारी