प्रजासत्ताक दिनाच्या आधी रेल्वेचा मोठा निर्णय, मराठवाड्यातून दिल्लीसाठी 3 स्पेशल ट्रेन, वेळापत्रक
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: दिल्लीसाठी नियमित रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. असे असताना रेल्वे प्रशासनाने केवळ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून अनेक प्रवासी दररोज रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. महाराष्ट्रातील विविध भागात त्यासोबत देशातील विविध भागांमध्ये देखील मराठवाड्यातून थेट रेल्वे सेवा आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे भारतीय रेल्वेकडून 23 ते 26 जानेवारी रोजी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. चंदीगड-नांदेड, दिल्ली (हजरत निजामुद्दीन)-नांदेड, अमृतसर-चेरलापल्ली मार्गावर या विशेष ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. वर विशेष रेल्वे धावणार आहेत.
23 ते 26 जानेवारीदरम्यान धावणार विशेष रेल्वे
मराठवाड्यातून दिल्ली व उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, मराठवाडा आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीला जाण्यासाठी सचखंड ही एकच रेल्वे आहे. या रेल्वेवर खूप ताण असल्याने प्रवाशांसाठी नव्याने विशेष रेल्वे सोडल्या आहेत. दिल्लीसाठी नियमित रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. असे असताना रेल्वे प्रशासनाने केवळ विशेष गाड्यांवर मराठवाड्यातील प्रवाशांची बोळवण केली आहे.
advertisement
अमृतसर-चेरलापल्ली (04542) रेल्वे अमृतसरहून 23 आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 3.55 वाजता सुटेल. ही रेल्वे (04642) रेल्वे चेरलापल्लीहून 25 व 26 जानेवारी रोजी दुपारी 3.40 वाजता निघेल. चंदीगड नांदेड (04524) रेल्वे चंदीगड येथून 23 व 24 रोजी पहाटे 5.40 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे (04523) नांदेड येथून 25 आणि 26 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता निघेल. दिल्ली-नांदेड (04494) रेल्वे दिल्ली येथून 23 आणि 24 रोजी दुपारी 12.30 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासातील रेल्वे (04493) नांदेडहून 24 व 25 जानेवारी रोजी रात्री 8.10 वाजता सुटेल.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील विशेष रेल्वे
अमृतसर-चेरलापल्ली : दुपारी 2.15
चेरलापल्ली-अमृतसर : पहाटे 3.40
चंदीगड-नांदेड : सकाळी 8.15
नांदेड-चंदीगड : मध्यरात्री 1.15
दिल्ली-नांदेड : सकाळी 10.20
नांदेड-दिल्ली : रात्री 12.18
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 2:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्रजासत्ताक दिनाच्या आधी रेल्वेचा मोठा निर्णय, मराठवाड्यातून दिल्लीसाठी 3 स्पेशल ट्रेन, वेळापत्रक









