Shocking News : दुर्देवी! ज्या घरात सुख शोधलं, त्याच घरात सुनेचा शेवट; माहेरच्यांनी फोडला हत्येचा टाहो

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : वाणेगाव येथील 31 वर्षीय सुनीता भोकरे विहिरीत मृत आढळल्याने माहेरकडील नातेवाइकांनी सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला. फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर शव ठेवून तब्बल साडेचार तास आंदोलन झाले.

फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून साडेचार तास आंदोलन
फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून साडेचार तास आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे 31 वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी मारहाण करून तिला विहिरीत ढकलल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाइकांनी फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सुनीता अण्णा भोकरे (वय 31) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
अंत्यविधीसाठी बाहेर जाणं ठरलं निमित्त?
सासरचे बाहेर गेले अंत्यविधीसाठी गेले अन् घरातील सुनेचा घरी अंत झाला; माहेरच्यांनी सासरच्या मंडळीवर केला हत्येचा संशय. सुनीता या सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिवाजी गवळी यांची मुलगी असून बारा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह वाणेगाव येथील अण्णा भोकरे याच्याशी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मंगळवारी सकाळी सुनीताचे सासू, सासरे आणि जाऊ हे विरमगाव येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. याच दरम्यान दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास सुनीता घराबाहेर पडल्या. मात्र त्या घरी परत न आल्याने सायंकाळपासून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. अखेर बुधवारी सकाळी गावाजवळील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
advertisement
‎पोलिसांनी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र, सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केल्याचा आरोप करीत माहेरच्या नातेवाइकांनी शवविच्छेदनास नकार दिला. तसेच इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानंतर मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह थेट फुलंब्री पोलिस ठाण्यात आणण्यात आला. खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाइकांनी पोलिस ठाण्यासमोरच मृतदेह ठेवून आंदोलन छेडले. कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी यासाठी दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते.
advertisement
‎जेसीबी खरेदीसाठी सुनीता यांचा सातत्याने छळ
‎जेसीबी खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी सुनीता यांचा सातत्याने छळ केला जात असल्याची तक्रार मयत महिलेचे भाऊ गजानन गवळी यांनी दिली आहे. या तक्रारीवरून पती अण्णा भोकरे, सासू मनूबाई भोकरे, सासरा राजाराम भोकरे, जाऊ गंगूबाई संतोष भोकरे, नणंद भागीनाथ गायकवाड आणि नणंद राजू कारले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
‎आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी व्हिडीओ कॉलद्वारे दाखवल्यानंतरच नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर रात्री 11:30 वाजता वाणेगाव येथे सुनीता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shocking News : दुर्देवी! ज्या घरात सुख शोधलं, त्याच घरात सुनेचा शेवट; माहेरच्यांनी फोडला हत्येचा टाहो
Next Article
advertisement
BMC Election: पहिल्या तासात  ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला,  मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ
  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू

  • काहींची नावे वगळल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

  • दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली.

View All
advertisement