advertisement

‎Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त छ. संभाजीनगरमध्ये वाहतुकीत बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

क्रांती चौक परिसरासह काही प्रमुख मार्गांवर तात्पुरती वाहतूक बंदी राहणार असून दररोज दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर वाहनांचे डायव्हर्जन करण्यात येणार आहे.

‎शिवजयंतीनिमित्त शहरात दोन दिवस वाहतूक बदल; प्रमुख मार्गांवर निर्बंध, पर्यायी रस
‎शिवजयंतीनिमित्त शहरात दोन दिवस वाहतूक बदल; प्रमुख मार्गांवर निर्बंध, पर्यायी रस
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि शिवभक्तांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक विभागाने 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी शहरातील मध्यवर्ती भागात विशेष वाहतूक बदल जाहीर केले आहेत. क्रांती चौक परिसरासह काही प्रमुख मार्गांवर तात्पुरती वाहतूक बंदी राहणार असून दररोज दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर वाहनांचे डायव्हर्जन करण्यात येणार आहे. सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
‎शिवजयंतीच्या मिरवणुकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी संयम बाळगून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार, 18 फेब्रुवारी
‎वेळ : सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत
advertisement
‎बंद राहणारे मार्ग :
‎गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक, क्रांती चौक उड्डाणपूल पूर्व बाजू सर्व्हिस रोड ते पश्चिम बाजू सर्व्हिस रोड.
‎‎पर्यायी मार्ग :
1. गोपाल टी येथून उत्सव मंगल कार्यालय मार्गे पुढे जाता येईल.
‎2. गोपाल टी – एस.एस.सी. बोर्ड – चुन्नीलाल पेट्रोल पंप मार्ग उपलब्ध राहील.
‎3. सिल्लेखाना ते सावरकर चौक – सतीश मोटर्स मार्ग वापरता येईल.
advertisement
‎4. सिल्लेखाना ते खोकडपुरा मार्गे पर्यायी व्यवस्था असेल.
5. क्रांती चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.
‎गुरुवार, 19 फेब्रुवारी
‎वेळ : सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत
या दिवशी खालील मार्गांवर निर्बंध राहणार आहेत :
‎राजाबाजार चौक – संस्थान गणपती – शहागंज – सिटी चौक – गुलमंडी – पैठणगेट – सिल्लेखाना – क्रांती चौक – गोपाल टी – सिडको एन-१२ नर्सरी – टीव्ही सेंटर – जिजाऊ चौक – एम-२ – एन-९ – शिवनेरी कॉलनी – पार्श्वनाथ चौक – वळीराम पाटील चौक – बजरंग चौक – आविष्कार चौक – शिवाजी महाराज पुतळा – चिश्तिया चौक तसेच जयभवानीनगर चौक – गजानन महाराज मंदिर – सेव्हनहिल उड्डाणपूल – आदिनाथ चौक.
advertisement
मध्यवर्ती भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग
‎1. शहागंजकडून सिटी चौककडे येणारी वाहने चेलीपुरा – लोटाकारंजा – कामाक्षी लॉज मार्गाचा वापर करतील.
‎2. क्रांती चौक ते सिटी चौककडे जाणारी वाहने सावरकर चौक – कार्तिकी हॉटेल चौक – मिलकॉर्नर – भडकल गेट या मार्गाने वळवली जातील.
‎3. मिलकॉर्नरहून औरंगपुराकडे येणाऱ्या वाहनांसाठी अंजली टॉकीजसमोरून उजवीकडे नागेश्वरवाडी – निराला बाजार – समर्थनगर किंवा डावीकडे खडकेश्वर मनपा कार्यालय मार्ग खुला राहील.
advertisement
4. चांदणे चौक – अण्णाभाऊ साठे चौक – उद्धवराव पाटील चौक – हडको कॉर्नर – हर्सूल टी – शरद टी – आंबेडकर चौक – एन-१ चौक हा मार्ग वापरता येईल.
‎5. जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिरदरम्यान जालना रोडचा पर्याय देण्यात आला आहे.
6. जवाहरनगर पोलिस स्टेशनकडून सेव्हनहिलकडे येणाऱ्या वाहनांसाठी माणिक हॉस्पिटल – त्रिमूर्ती चौक मार्ग उपलब्ध असेल.
advertisement
‎शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि शिवजयंती सोहळे निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित केले आहे. वाहनधारकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार पर्यायी मार्गांचा अवलंब करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
‎Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त छ. संभाजीनगरमध्ये वाहतुकीत बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement