Chhatrapati Sambhajinagar: 'पांढरं सोनं काळं पडलं, आता काय करू..?', चिखलात बसून शेतकऱ्याचा आक्रोश, Video
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कित्येक दिवसांपासून शेतातील पिकं पाण्यात आहेत.
छत्रपती संभाजीनगर: यावर्षी मराठवाड्यामध्ये पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाने थैमान घातलं असून अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसानं झालं आहे.
सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विक्रमी पाऊस पडला आहे. नद्यांना पूर आला असून पुराचं पाणी गावं आणि शेतांमध्ये शिरलं आहे. कित्येक दिवसांपासून शेतातील पिकं पाण्यात आहेत. त्यामुळे ती आता सडू लागली आहेत. डोळ्यांसमोर स्वतःच्या शेतातील पीक सडताना पाहून एका शेतकऱ्याला सहन झालं नाही. तो शेतातच धाय मोकलून रडला. या शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याने चिखलामध्ये लोळून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
advertisement
आपल्या मनातील तीव्र वेदना व्यक्त करताना शेतकरी म्हणाला, "आमच्या शेतातील पांढरं सोनं आता काळं पडलं आहे. आता आम्ही करायचं तरी काय? कर्जाचा एवढा मोठा डोंगर आहे तो कशाने फेडायचा. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. सगळ्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. काय करावं काही सुचत नाही."
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाले आहेत. सोयाबीन, कपाशी आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांचं पशुधन देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. सर्व बाजूंनी संकटात सापडलेला शेतकरी सरकारकडून मोठ्या मदतीची आशा धरून आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 29, 2025 1:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar: 'पांढरं सोनं काळं पडलं, आता काय करू..?', चिखलात बसून शेतकऱ्याचा आक्रोश, Video