छत्रपती संभाजीनगर हादरलं! 80 वर्षीय निराधार वृद्धेवर लैंगिक अत्याचार, एका नराधमाने व्हिडीओही केला Viral
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील एका 80 वर्षीय निराधार वृद्ध महिलेला लक्ष्य करून नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील जरंडी गावात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील एका 80 वर्षीय निराधार वृद्ध महिलेला लक्ष्य करून नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढले. संतप्त जमावाने आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नाही, अशा भावना व्यक्त करत जमावाने त्याला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर, अधिक गोंधळ होऊ नये म्हणून आरोपीला तातडीने सोयगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
advertisement
पोलिसांची कारवाई आणि तपास
सोयगाव पोलिसांनी याप्रकरणी पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून किंवा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा व्हिडिओ कोणी बनवला आणि तो प्रसारित करण्यामागे काय उद्देश होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे जरंडी परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी पीडित वृद्धेला वैद्यकीय उपचारांसाठी पाठवले असून, तिला मानसिक आधार देण्याचे कामही सामाजिक संस्थांकडून केले जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 8:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगर हादरलं! 80 वर्षीय निराधार वृद्धेवर लैंगिक अत्याचार, एका नराधमाने व्हिडीओही केला Viral










